नोकरीसाठी सोडाव्या लागतील ‘त्या’ गोष्टी; या राज्याने लागू केला भन्नाट नियम

दिल्ली :

नोकरी करण्यासाठी विविध ठिकाणी वेगवेगळे नियम लागू असतात. काही सार्वजनिक नियम असतात तर काही ऑफिसचे. आता एका राज्याने एक भन्नाट नियम लागू केला आहे ज्याचे सगळीकडे कौतुक होत आहे. नोकरी करण्यापूर्वी एकच महत्वाची अट सरकारने घातली आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या सर्वांना तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करता येणार नाही किंवा भविष्यात ते या पदार्थांचं सेवन करणार नाहीत, असं प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार आहे.  झारखंड सरकारने हा नियम येणार्‍या वर्षात १ एप्रिलला लागू करण्याचे ठरवले आहे.

दरम्यान ‘समितीने हा नियम एप्रिल २०२१ पासून लागू होईल असा निर्णय घेतला आहे. हे प्रतिज्ञापत्र झारखंड सरकारमध्ये नोकरी करू इच्छित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला द्यावं लागेल. ते केवळ कार्यालयातच नाही तर कार्यालयाबाहेरही तंबाखूशी संबंधित उत्पादनांचे सेवन करू शकणार नाहीत’, अशी माहिती राष्ट्रीय तंबाखू नियंत्रणचे राज्य नोडल अधिकारी एलआर पाठक यांनी दिली.

पोलिसनामाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांचा हवाला देत एका अहवालात ‘नुकत्याच रांची येथे झालेल्या झालेल्या तंबाखू नियंत्रण समितीच्या बैठकीत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये खाद्यपदार्थांची विक्री होणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. येथे चहा-बिस्किटांची विक्री होणार नाही, असं एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तंबाखूजन्य पदार्थंची विक्री करण्यासंदर्भतील निर्णयांवर सर्वांचे एकमत झालं पाहिजे. यामुळे नवीन पिढीला तंबाखूचे सेवन करण्यासारख्या वाईट सवयीपासून वाचवण्यासाठी मदत होईल’, असे सांगितले गेले. 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here