शेतकरी आंदोलनावरून शरद पवारही झाले आक्रमक; उचलले ‘ते’ पाऊल

मुंबई :

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरुद्ध दिल्लीच्या सीमेवर गेल्या 10 दिवसांपासून हजारो शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे. यात देशभरातील जवळपास 40 शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत. आता माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी कायद्यांविरुद्ध शड्डू ठोकला आहे. शरद पवार हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची 9 डिसेंबर रोजी दिल्लीत भेट घेणार आहे. ही भेट कृषी कायदा विरोधाच्या संदर्भात असणार आहे. कृषी कायद्याविरोधात शरद पवार हे राष्ट्रपतींकडे नवी भूमिका मांडणार असल्याची शक्यता आहे.

9 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता ही भेट होणार असल्याची माहिती मिळतेय. यावेळी पवार यांच्यासोबत अन्य राजकीय पक्षांचे काही नेते उपस्थित असणार आहेत.

‘’पंजाब आणि हरियाणाचा शेतकरी हा रस्त्यावर उतरला आहे. याचे गांभीर्य सरकारने घेतले पाहिजे. पण दुर्दैवाने या आंदोलनाची अशी दखल घेतली नसल्याचे दिसून आले आहे. जर असंच राहिले तर हे आंदोलन फक्त दिल्लीपुरते मर्यादित राहणार नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकं शेतकऱ्याच्या आंदोलनात पाठिशी उभे राहतील आणि प्रश्नाची सोडवणूक आपल्या पद्धतीने करतील. त्यामुळे मोदी सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी’, असे म्हणत शरद पवारांनी मोदी सरकारला सल्लावजा टोला लगावला.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here