मोठी बातमी… सामान्य भारतीयांच्या पसंतीस उतरलेली ‘ही’ कारही झाली क्रॅश टेस्टमध्ये फेल

मुंबई :

काही दिवसांपूर्वी ग्बोबल NCAP (New Car Assessment Programme) द्वारे टेस्ट केल्यानंतर मारुती सुझुकीच्या एस-प्रेसो या कारला शून्य रेटिंग देण्यात आलं. तसेच मारुती सुझुकी एस-प्रेसो ही कार सुरक्षित नसल्याचं प्रमाणपत्रही देण्यात आलं. त्यानंतर वाहन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. अगदी सामान्य माणसेही आपल्या गाडीला क्रॅश टेस्टमध्ये किती रेटिंग आहे ते चेक करू लागली. अशातच आता दुसरी धक्कादायक बातमी समोर आली आहे.

रेनोल्टच्या क्विड या कारला दक्षिण आफ्रिकेतील मॉडेलला क्रॅश टेस्टमध्ये केवळ 2 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे दक्षिण आफ्रिकेत विकली जाणारी क्विड ही भारतात विकल्या जाणार्‍या क्विडपेक्षा अधिक सुरक्षित आहे. म्हणजेच भारतातील क्विडला किती असुरक्षित आहे, हे आपल्या लक्षात येईल.

विशेष बाब म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील क्विडची ही दुसरी टेस्ट होती, यातही ती अयशस्वी झाली.

भारतात 2016 मध्ये ही कार जेव्हा लाँच केली होती, त्यादरम्यान कंपनीने ही कार ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टसाठी पाठवली होती. तेव्हा या कारला सुरक्षिततेच्या बाबतीत केवळ एक स्टार रेटिंग मिळालं होतं. त्यानंतर कंपनीने या कारमध्ये काही बदलदेखील केले. कंपनीने या कारच्या ब्राझील व्हेरियंटमध्ये खूप चांगले बदल केले आहेत. त्यामुळे तिथे या कारला 3 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. या कारच्या भारतातील व्हेरियंटला 1, दक्षिण आफ्रिकेतील व्हेरिंयंटला 2 आणि ब्राझीलमधील व्हेरियंटला 3 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे.    

संपादन : स्वप्नील पवार 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here