‘हे शेतकरी नाहीतच, खरे तिकडेच आहेत..’; मोदींच्या मंत्र्यांनी ओतले आगीत आणखी तेल

शेतकरी आंदोलकांशी योग्य पद्धतीने संवाद न साधता उलट त्यांना खलिस्तानी किंवा दहशतवादी म्हणून हिणवण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. परिणामी दिल्लीतील शेतकरी आंदोलक आणखी आक्रमकपणे आपल्या मागण्या पुढे रेटत आहेत. त्याच आगीत तेल ओतण्याचे काम मोदींच्या मंत्र्यांनी केले आहे.

आंदोलनाला हिंसक स्वरूप मिळण्याची आणि त्याद्वारे पुन्हा एकदा हमीभाव काढणे आणि करार शेतीमधील जाचक अटी कायम ठेऊन कॉर्पोरेट मंडळींना धार्जिणे कायदे रेटण्यासाठी आंदोलनात फुट पडण्याचे प्रयत्न होत आहेत. आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळातील केंद्रींय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी आगीत तेल ओतण्याचे मोठे ‘कर्तव्य’ बजावले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, हमीभाव अजिबात काढून घेतला जाणार नाही. मात्र, सध्याचे आंदोलक हे शेतकरी नाहीत. खरे शेतकरी शेतात काम करीत आहेत. मोदींचे धेरण शेतकरी हिताचे आहे. आमचा त्यावर पूर्ण विश्वास आहे. बाजार स्वातंत्र्य देणारे हे कायदे आहेत. अपेक्षा आहे की, शेतकरी हे देशातील शांतता भंग करण्याचे प्रयत्न करणार नाहीत. काहीजण या आंदोलनात तेल ओतून आगीचा भडका करण्याच्या प्रयत्नात आहेत.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here