गांजा नाही धोकादायक; होय, ‘त्यांनी’ यादीतून वगळले की या पदार्थाला..!

व्यसन कोणतेही असो, ते घातक. व्यसन म्हणजे मन व शरीरावर ताबा ठेऊ न देणारे आणि पुन्हा-पुन्हा तेच करावे वाटणारा घातक प्रकार. गांजा सेवन हा प्रकारही त्यातलाच. मात्र, आता गांजा या घटकाला धोकादायक पदार्थांच्या यादीतून वगळण्यात आलेले आहे.

फेसबुकवर सुप्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी याबाबत पोस्ट लिहून माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले आहे की, धोकादायक पदार्थांच्या यादीतून गांजाला वगळले आहे. युनोमध्ये २७ देशांनी बहुमताने निर्णय हा निर्णय घेतला आहे. अफू, चरस, गांजा सेवन व विक्री करणाऱ्यांना पकडण्याची मोहीम केंद्र सरकारने सुरू केली. अनेक सिनेकलावंतांच्या चौकश्या आणि टीव्ही वरील बातम्यांचा धुराळा उडवून देण्यात आला. आता सगळ्यांनी याविषयावर बोलावे आणि आपले मत व्यक्त करावे.

https://www.facebook.com/asimsarode/posts/10158763038440185

गांजा (भांग) आणि गांजाची राळ (रेझिन) यांना फार धोकादायक पदार्थांच्या यादीतून वगळण्यासाठी संयुक्त राष्ट्रांत बहुमताने पाठिंबा मिळाला. अमली पदार्थावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत हा निर्णय संयुक्त राष्ट्रांच्या अमली पदार्थावरील आयोगाने बुधवारी ६३ व्या सत्रात घेतला. या निर्णयामुळे गांजाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नियमित करण्यासाठीच्या बदलांना चालना मिळेल, असेही त्यांनी लिहिले आहे.

पुढे असीम सरोदे यांनी म्हटले आहे की, अमली पदार्थांवरील 1961 मधील सिंगल कॉन्फरन्स च्या अनुसूची चारमधून गांजाला हटविण्यासाठी आयोगाने निर्णय घेतला. या अनुसूचीत घातक मार्फिन, हेरॉईनसह गांजाचा समावेश केला गेला होता, असे संयुक्त राष्ट्रांनी दोन डिसेंबर रोजी जारी केलेल्या वृत्त निवेदनात म्हटले. 59 वर्षांपासून गांजा वर कठोर बंधने होती. मादक पदार्थ सेवन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई व्हावी हे माझे मत आहेच. ज्वलंत प्रश्न व अनेक मुख्य मुद्यांना बगल देण्यासाठी व लक्ष विचलित करण्यासाठी ज्या पद्धतीने मादक द्रव्य वापर करणाऱ्यांवर कारवाया झाल्या त्या कायदा हातात घेणाऱ्या होत्या. आता कोण काय काय बोलतात बघूया.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here