‘ते’ इंजेक्शन कुत्र्यांचे, ‘इथून’ केली होती मागणी; डॉ. शीतल आमटे आत्महत्या प्रकरणात ‘ही’ धक्कादायक माहिती उघड

मुंबई :

आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी 30 तारखेला आत्महत्या केली. स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून घेतल्याची माहिती नंतर समोर आली होती. त्यांनी आत्महत्या नेमकं का केली हे अद्याप समोर आले नसले तरीही पोलिसांच्या तपासात कुत्र्यांसाठीचे इंजेक्शन टोचून आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घरच्या पाळीव कुत्र्यासाठी इंजेक्शन मागवण्यात आले होते. नागपूरच्या फार्मसिस्टच्या चौकशीतून ही धक्कादायक बाब समोर आली.

या आत्महत्या प्रकरणात असेही समोर आले आहे की, त्यांना ५ इंजेक्शन मागवले होते. त्यापैकी एक इंजेक्शन त्यांच्या मृतदेहाबाजूला तुटलेल्या अवस्थेत सापडलं असल्याचं सांगण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याची माहिती आमटे कुटुंबीयांनी नुकतीच दिली होती. या वादावर तोडगा काढण्याच्या उद्देशाने डॉ. विकास आणि डॉ. भारती आमटे हे हेमलकसा प्रकल्पात गेले होते. त्यावेळी शीतल या आपल्या खोलीत एकट्याच होत्या. त्याचवेळी हा प्रकार घडला.

तर कुत्र्यांच्या इंजेक्शनमुळे माणसाचा मृत्यू होतो का, तो किती प्रमाणात घ्यायला हवा, शीतल यांच्या व्हिसेरा अहवालात इंजेक्शनचे अंश सापडतात का? या सर्व गोष्टींचा तपास आता सुरू आहे. डॉ. शीतल आमटे या आनंदवनच्या महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here