म्हणून महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडी; ’या’ पक्षाने आघाडीतील नेत्यांना दिला गंभीर इशारा

मुंबई :

पुन्हा एकदा आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस यांच्यातील कुरबुरी सातत्याने राजकीय वर्तुळात चर्चेला येताना दिसत आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण असल्याची चर्चा होती. पण आता महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांच्या ट्विटमुळे काँग्रेसची नाराजी उघड झाली आहे.

महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. ‘आघाडीमधील काही नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आले आहेत. काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की, हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल, तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावं. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी करावं. काँग्रेसचं नेतृत्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे,’ असं म्हणत ठाकूर यांनी महाआघाडीतील नेत्यांना सूचक इशारा दिला आहे.

लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत शरद पवार यांना काँग्रेसच्या सध्याच्या परिस्थितीबाबत काय वाटतं? असं विचारलं असता अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं होतं. यात त्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाबाबतही विधान केलं. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सातत्याचा अभाव दिसतो, असं शरद पवार म्हणाले होते.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here