आगबबो… पेट्रोलने केला कहर, राज्यातील 19 जिल्ह्यात पेट्रोलनं गाठला ‘तो’ उच्चांक; डिझेलही 80 पार

मुंबई :

वाढत्या महागाईमुळे तुमच्या खिशावरील भार वाढलेला असताना अजून एक मोठी बातमी आली आहे. तुमच्या खिशावर अजून भार घेण्यासाठी तयार राहा कारण आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. राज्यातील सात जिल्ह्यामध्ये डिझेलचे दर 80 रुपयांच्या वर गेले आहेत.

काल सरकारी तेल कंपन्यांनी डिझेल- पेट्रोलच्या किंमती वाढवल्याचे जाहीर केले आहे. डिझेलच्या दरात 18 ते 20 पैशांची वाढ झाली तर पेट्रोलचे दर 15 ते 17 पैशांने वाढले होते. त्यात आज पुन्हा वाढ झाली आहे. कोरोना काळात पेट्रोल- डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे देशात इंधनाचे दरही वाढले आहेत. नोव्हेंबरमध्ये कच्च्या तेलाच्या दोन्ही मोठ्या करारांमध्ये 27 टक्क्यांची वाढ झाली आहे. कोरोना लस लवकरच आल्याची बातमी कच्च्या तेलाच्या किंमतीं वाढवणारी ठरली.

महाराष्ट्रभरातील तब्बल 19 जिल्ह्यांमध्ये पेट्रोलच्या किंमतींनी 90 रुपयांचा टप्पा ओलांडला असून मुंबई त्या उंबरठ्यावर आहे. मुंबई शहरामध्ये डिझेलची किंमत 24 पैशांनी वाढून 79.66 रुपयांवर गेली आहे. त्याचप्रमाणे पेट्रोलच्या किंमतीही 19 पैशांनी वाढल्या आहेत. नागपूर, परभणी, नांदेड, सोलापूर, अमरावती, औरंगाबाद आणि बुलढाणा या जिल्ह्यात डिझेलच्या किंमत एका लिटरला 80 रुपयांच्या वर गेली आहे. परभणीत पेट्रोल दर सर्वाधिक 91.95 रुपये आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किंमतींमध्ये जोरदार वाढ झाली आहे. नोव्हेंबर महिना रेकॉर्ड ब्रेकिंग ठरला आहे. या कालावधीत क्रूडची किंमत गेल्या 20 वर्षात तिसर्‍या क्रमांकाची झाली आहे. नोव्हेंबरमध्ये ब्रेंट क्रूड 23 टक्क्यांनी महागला आहे, तर WTI क्रूडमध्ये 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here