मूगडाळ भजी ‘असे’ आहेत आरोग्यदायी; वाचा रेसिपी आणि फायदे

सर्वसाधारणपणे तेलकट आणि झणझणीत पदार्थ हे आरोग्यदायी नसतात, असा समज आहे. अर्थात हे काही अंशी खरे असले तरी मुगडाळ भजी बाबत हे लागू होत नाही. पावसाळा आला की आपल्याला बटाटा, कांदा, मुगडाळ भजीची आठवण होते. आज आम्ही मुगडाळ भजीचे फायदे सांगणार आहोत. हे फायदे वाचून तुम्ही बिनधास्त मुगडाळ भाजी खा.

हे आहेत फायदे :-

 • चवीस उत्तम. पचनाच्या तक्रारी येत नाहीत.
 • डब्याला नेण्यासाठी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम
 • विविध भाज्या टाकल्या तर अधिक रूचकर बनतो.
 • कॅल्शिअम, आयर्न, तंतुमय पदार्थ, कबरेदके आणि प्रथिने यातून मिळतात.

अशी आहे रेसिपी :-

जिन्नस :-

 • मूगदाळ- २ वाटी
 • चिरलेली कोथिंबीर- पाव वाटी
 • हिंग- १ चिमूट
 • मिरे, धने- प्रत्येकी एक छोटा चमचा
 • आले- अर्धा इंच ल्ल हिरवी मिरची- १ ते २
 • मीठ आवश्यकतेनुसार तेल

बनवण्याची पद्धत :-

 • मूगदाळ रात्री भिजत घालावी.
 • भिजलेली मूगडाळ पाणी निथळून मिरची, आले, हिंग टाकून वाटून घ्यावी.
 • घट्टसर मिश्रण तयार करून चवीनुसार मीठ टाकावे.
 • मिरे, धने जाडसर वाटून त्यात मिसळावे.
 • कोथिंबीर मिसळून मिश्रण व्यवस्थित एकत्र करावे.
 • तेल तापवून या मिश्रणापासून भजी तयार कराव्यात.
 • कोथिंबीर चटणी/ चिंचेच्या चटणीबरोबर गरम गरम खाण्यास द्याव्यात.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here