मोबाईलविषयी ‘या’ काही गोष्टी तुम्हाला नक्कीच नसतील माहिती; वाचून व्हाल आश्चर्यचकित

मोबाईलने अनेक गोष्टी सोप्या केल्या आहेत. आता हे वाचताना तुमच्यापैकी बहुतांश जण मोबाईलवर वाचत असतील. आणि मीही हे मोबाईलवरच लिहून अपलोड करत आहे. हाच मोबाईल आता आपली ओळख ठरवत आहे. आपले अस्तित्व निर्माण करण्याची संधी देत आहे कारण अगदी tiktok वापरून सेलिब्रिटी झालेले सामान्य लोक तुम्ही पहिलेच असतील. ती या मोबाईलचीच देणं आहे. ह्याच मोबाईलच्या गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नाहीत त्या आपण बघूया.

1) ‘नोकिया 1110 हा फोन जुना आहे पण छावा आहे. ह्या मोबाईलने एक विश्वविक्रम केला आहे. नोकिया कंपनीने तब्बल 250 दशलक्ष मोबाईल विकले होते.

2) 1983 साली जगातील पहिल्या फोनची किंमत २५८२६० रु. एवढी होती. तो अमेरिकेत बनवला होता.

3) 2012 साली मोबाईल बनवणाऱ्या “ऍपल” कंपनीने एकाच दिवसात 3 लाख 40 हजार फोन विकले.

4) आपण वापरत असलेल्या मोबाईल फोन वर बाथरूम च्या हॅण्डल वर असलेल्या किटाणूपेक्षा १८ पटीने जास्त किटाणू आढळून येतात. त्यामुळे आपला फोन सुरक्षितपणे हाताळा. शिवाय क्लीनर ने स्वच्छ सुद्धा करा.

5) मोबाईल मधल्या रेडिएशन मुळे “निद्रानाश, डोकेदुखी तसेच तणाव आणि गोंधळ’ निर्माण होतो.

6) जगातील 1973 साली त्यांनी पहिला मोबाईल फोन कॉल केला होता .

7) सध्या वापरात असलेल्या फोनची काम्पुटिंग पॉवर ही चंद्रावर पाठवण्यात आलेल्या ‘अपोलो ११’ यानासाठी वापरण्यात आलेल्या पॉवर पेक्षा जास्त आहे.

8) 70% फोन हे चीनमध्ये तयार होतात.

9) जगात असलेल्या लोकसंख्येच्या 80% लोकांकडे मोबाईल फोन आहेत.

10) सरासरी दिवसातून 110 वेळा मोबाईल युजर आपला फोन अनलॉक करीत असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here