आरबीआयच्या निर्णयामुळे शेअर मार्केटवर झाला ‘असा’ परिणाम; वाचा अधिक

मुंबई :

आरबीआयच्या डिसेंबरच्या पतधोरण आढाव्याच्या निकालासह बाजारात तेजीची नोंद झाली आहे. सेन्सेक्स 328.72 अंकांनी वाढून 44,961.37 च्या पातळीवर पोहोचला. त्याचबरोबर निफ्टीने 13230.25 गाठला आहे. वाढती किरकोळ महागाई पाहता आरबीआयने मुख्य व्याज दरामध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. रेपो दर 4%, रिव्हर्स रेपो दर 3.35%, रोख राखीव प्रमाण 3% आणि एमएसएफ दर आणि बँक दर 4.25% च्या पातळीवर कायम आहेत.

शुक्रवारी शेअर बाजार वाढीसह सुरू झाला. बीएसईचा सेन्सेक्स 33.26 अंकांनी वधारून, 44,665.91 वर आणि एनएसई निफ्टीने. 43.50० अंक वाढीसह 13,177.40 वर खुला झाला. सलामीच्या काही मिनिटांतच सेन्सेक्स 171.69 अंकांनी वधारून 44,804.34 च्या पातळीवर पोहोचला. सेन्सेक्सच्या 30 पैकी टीसीएस, टायटन, रिलायन्स, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी, टेक महिंद्रा आणि इन्फोसिस हे शेअर्स सुरूवातीला लाल चिन्हात आहेत. निफ्टीवर आयटी शेअर्स वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक ग्रीन मार्कमध्ये उघडले.

जागतिक बाजारपेठेत अमेरिकेचा बाजार वाढीसह बंद झाला आहे आणि युरोपियन बाजार घसरणसह बंद झाला आहे. NIKKEI 225, हांग सेन्ग, जकार्ता कंपोजिट आणि शांघाई कंपोझिट वगळता अन्य बाजारपेठा आशियाई बाजारात हिरव्या चिन्हावर व्यापार करीत आहेत.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here