थंडीपासून गाईंचा बचाव करण्यासाठी यूपी सरकारने घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय; वाचा कसा होईल फायदा

दिल्ली :

उत्तर प्रदेश सरकारने उघड्यावर फिरणाऱ्या गायींसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. थंडीच्या दिवसात उघड्यावर फिरणाऱ्या जनावरांवर मोठा परिणाम होतो. थंडीच्या दिवसात गरीबांची व्यवस्था करण्यासाठी सरकार किंवा स्थानिक प्रशासनातर्फे शेल्टरची व्यवस्था केली जाते. मात्र उघड्यावर असणार्‍या मुक्या जीवांसाठी कोणतीही व्यवस्था नसते. म्हणूनच आता योगी सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे.       

उत्तर प्रदेश मधील उघड्यावर फिरणाऱ्या गायींचा थंडीपासून बचाव होण्यासाठी विशेष कोट मिळणार आहेत. त्यामुळे योगी सरकारचे कौतुक होत आहे. शासनाच्या निर्देशानंतर पशुपाल विभागाचे अधिकारी गायींना ज्यूटपासून बनवलेले कोट बनवण्याची तयारी करत आहेत. यामुळे गाईंना थंडी लागणार नाही. थंड हवा आत शिरु नये म्हणून गोशाळेला मोठ्या पॉलीथीनच्या पडद्याने झाकलं गेल्याचे सांगण्यात येतंय. इतर प्राणिमित्र संघटनांनी इतर प्राण्यांचाही विचार करावा, अशी मागणी केली आहे. 

राज्याच्या पशुपालन विभागान विविध जिल्ह्यातील पशु चिकित्सक अधिकाऱ्यांना यासंदर्भातील निर्देश दिले आहेत. थंडीच्या दिवसात राज्यातील गोशाळांमधील गायींना थंडीपासून योग्य उपाय करावेत असेही सांगण्यात आलंय.

अयोध्येमध्ये गाईंना थंडीपासून वाचण्यासाठी पशुशाळांची व्यवस्था करण्यात आलीय. गावात उघड्यार फिरणाऱ्या प्राण्यांची काळजी घेण्यासाठी, त्यांना चारा मिळावा यासाठी ही पशुशाळा आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वत: वेळोवेळी या पशुशाळेंची तपासणी करतात.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here