पेट्रोल-डिझेलच्या दरात झाला बदल; वाचा, काय आहेत नवे दर

दिल्ली :

वाढत्या महागाईमुळे तुमच्या खिशावरील भार वाढलेला असताना अजून एक मोठी बातमी आली आहे. तुमच्या खिशावर अजून भार घेण्यासाठी तयार राहा कारण आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आज पेट्रोलच्या किंमतीत 20 पैशांनी तर डिझेलच्या किंमतीत 23 पैशांनी वाढ झाली आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये शुक्रवारी पेट्रोलचे भाव 82.86 रुपये लीटर तर डिझेलचे भाव 73.07 रुपये प्रति लीटर झाले आहेत.

देशात पेट्रोलची किंमत 25 महिन्यात प्रथमच एका उंचीवर पोहोचली आहे. 19 नोव्हेंबरपासून पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 1.28 रुपयांनी वाढ झाली आहे. या काळात डिझेलच्या दरात प्रतिलिटर 1.96 रुपयांनी वाढ झाली आहे. मुंबईमध्ये देखील पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 89.52 रुपये 79.66 रुपये प्रति लीटर आहेत. मध्य प्रदेशमध्ये पेट्रोल-डिझेलचे भाव सर्वाधिक आहेत. याठिकाणी पेट्रोल 90.62 रुपये तर डिझेल 80.83 रुपये प्रति लीटर आहेत. यानंतर इंधनवाढ गेल्या 25 महिन्यातील सर्वोच्च स्तरावर आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे देशात इंधनाचे दरही वाढले आहेत. नोव्हेंबरमध्ये कच्च्या तेलाच्या दोन्ही मोठ्या करारांमध्ये 27 टक्क्यांची वाढ झाली आहे. कोरोना लस लवकरच आल्याची बातमी कच्च्या तेलाच्या किंमतीं वाढवणारी ठरली.

सरकारने पेट्रोलवर 10 रुपये आणि डिझेलवर 13 रुपये प्रति लीटरने उत्पादन शुक्ल आणखी वाढवले. याआधी 2014 मध्ये पेट्रोलवरील टॅक्स 9.48 रुपये प्रति लीटर आणि डिझेलवर 3.56 रुपयांने वाढवले होते. नोव्हेंबर 2014 ते जानेवारी 2016 पर्यंत केंद्र सरकारने या दरात 9 वेळा वाढ केली आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here