दहावीनंतर छोटे कोर्स केल्यास ‘अशी’ आहे संधी; मिळवा उत्तम पैसे

दहावीनंतर नेमक काय करायचं असा प्रश्न सर्वांसमोर असतो. बर्‍याचदा उच्च शिक्षण घेऊनही अनेक विद्यार्थी जे कमवत नाहीत ते छोटे-छोटे कोर्स कमवतात. आज आम्ही तुम्हाला अशाच छोट्या कोर्सविषयी सांगणार आहोत. ज्यातून तुम्ही कमी वेळेत एखाद्या क्षेत्रातील उत्तम शिक्षण घेऊ शकाल तसेच उत्तम पैसेही क्मवू शकाल. यात असेही काही पर्याय आहेत ज्यात तुम्ही नोकरी किंवा व्यवसायही करू शकता. विशेष बाब म्हणजे ज्यांना अर्धवेळ नोकरी करून शिक्षण घ्यायचे आहे तेही या कोर्ससाठी जाऊ शकतात. एकूणच काय तर सर्वच प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी या संधी उपलब्ध आहेत.    

जाणून घेवूयात अशा पर्यायाविषयी :-        

दहावीनंतर अनेक ठिकाणी टायपिस्ट आणि स्टेनोग्राफरचा कोर्स उपलब्ध आहे. यात मुलांसह मुलींनाही संधी आहे. मोठमोठ्या ऑफिसेस आणि बहुतांश सरकारी विभागात या पदांसाठी जागा काढल्या जातात.  
आपण इच्छित असल्यास नियमित अभ्यासासह स्टेनोग्राफी आणि टाइपिंगमध्ये 6 महिन्यांचा किंवा एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स करू शकता. त्यामुळे अर्धवेळ नोकरीदेखील मिळू शकते.

हॉटेल व्यवस्थापन म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट होय. हा कोर्स अगदी कमी वेळेचा असून यात प्रचंड मोमोठ्या संधी आहेत. ज्यांना आपल्या जॉबमध्ये ग्लॅमर हवय ते विद्यार्थी या क्षेत्रात जाऊ शकतात. ज्यांना जास्त कष्ट आणि जास्त पगाराची नोकरी हवी आहे. त्यांच्यासाठी हे एकदम चांगले क्षेत्र आहे. हॉटेल मॅनेजमेंटच डिप्लोमाही करता येतो.

सध्याचे युग हे संगणक युग आहे. या क्षेत्रात प्रचंड संधी उपलब्ध आहेत. संगणक हार्डवेअर व नेटवर्किंग हा या क्षेत्रातील एक उत्तम पर्याय आहे. या भागात संगणकाची दुरुस्ती, नेटवर्किंग आदी कामे करता येतील.

औद्योगिक क्षेत्रात नोकरीसाठी अधिसूचना जारी केल्या जातात. आयटीआयमध्ये दहावी, बरेच इलेक्ट्रीशियन, प्लंबर, वेल्डर, फिटर, मोटर मेकॅनिक, सुतार, संगणक इत्यादी उत्तीर्ण झाल्यावर औद्योगिक क्षेत्रात नोकरी किंवा स्वतःचा व्यवसायदेखील सुरू करू शकता.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here