‘त्या’ बाबतीत एअरटेल आहे सर्वात पुढे; जिओलाही दिली मोठी टक्कर, व्होडाफोन आयडियाची झाली ‘ही’ अवस्था

दिल्ली : 

नवीन मोबाइल ग्राहक जोडण्याच्या बाबतीत भारती एअरटेलने सप्टेंबरमध्ये रिलायन्स जिओला मागे टाकले आहे. गुरुवारी टेलिकॉम नियामक ट्रायने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, चार वर्षांच्या कालावधीनंतर असे घडले आहे. रिलायन्स जिओ सप्टेंबर 2016 मध्ये आपल्या कमर्शियल ऑपरेशनच्या सुरूवातीपासूनच  मंथली मोबाइल  सबस्क्रिप्शनमध्ये अव्वल स्थानावर होती. जेव्हा कंपनीने त्यांचे कमर्शियल ऑपरेशन सुरू केले तेव्हा कंपनीने 15.97 दशलक्ष नवीन ग्राहक जोडले होते.

3.77 मिलियन नवीन ग्राहकांसह भारती एअरटेल सप्टेंबरमध्ये ग्राहक जोडण्याच्या बाबतीत आघाडीवर आहे. यानंतर दुसर्‍या क्रमांकावर असणार्‍या रिलायन्स जिओने 1.46 दशलक्षची भर घातली आणि बीएसएनएलने 78,454 नवीन ग्राहक जोडले आहेत. व्होडाफोन आयडिया मागे आहे कारण या महिन्यात त्यांनी 4.65 दशलक्ष ग्राहक गमावले आहेत. एमटीएनएल आणि रिलायन्स कम्युनिकेशन्सचे अनुक्रमे 5,784 आणि 1,324 ग्राहक कमी झाले आहेत.

404.12 मिलियन ग्राहकांसह एकूण मोबाइल सब्सक्राइबर  ग्राहकांच्या बाबतीत रिलायन्स जिओ बाजारात अग्रेसर आहे. त्यानंतर 326.61 मिलियन सब्सक्राइबर्स ग्राहकांसह भारती एअरटेल, तर  व्होडाफोन आयडिया 295.49 मिलियन ग्राहक, बीएसएनएल 118.89 मिलियन सब्सक्राइबर्स ग्राहक आणि एमटीएनएल  3.33 मिलियन ग्राहक आहेत. देशातील एकूण दूरसंचार ग्राहकांचा आढावा या महिन्यात किरकोळ वाढून 1,168.66 मिलियन झाला आहे. ऑगस्टमध्ये ते 1,167.81 दशलक्ष होते.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here