मुंबई :
भारताने सर्जिकल स्ट्राईक करत अनेक चीनी अॅप बॅन केले. त्यात अनेक प्रसिद्ध अॅप सुद्धा समाविष्ट होते. टिक टॉक, शेअरइट, हॅलो, यूसी ब्राऊझर आणि पबी-जी सारखे अॅप बॅन करत चीनला मोठा झटका दिला. भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने चीनला धक्का बसेल अशी अनेक पाऊले उचलली आणि स्वदेशीला प्रोत्साहन देणार्या गोष्टीसुद्धा केल्या. विशेष बाब म्हणजे स्वदेशीला मोठ्या प्रमाणात लोकांनीही प्रतिसाद दिला.
दरम्यान पबी-जी ला टक्कर देण्यासाठी आलेली FAU-G गेमने नवा विक्रम रचला आहे. ही भारतीय गेम असून बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने कुमारने FAUG (Fearless and United Guards) नावाच्या गेमचा टीझर शेअर केला होता. या गेमला लाँचिंगपूर्वीच प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. गुगल प्ले-स्टोरवर अवघ्या 24 तासांमध्ये 10.6 लाख युजर्सनी प्री-रजिस्ट्रेशन केले आहे. ही संख्या अजून वाढत आहे.
या गेमबाबत माहिती देण्यासाठी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने ट्विट केले होते. त्यामध्ये अक्षयने म्हटले होते की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या अभियानाला समर्थन देत FAU-G गेम सादर करताना अत्यंत आनंद होत आहे. या गेममध्ये प्लेयर्स मनोरंजनाव्यतिरिक्त सैनिकांच्या बलिदानाविषयी माहिती मिळवू शकतील. या गेममधून जे उत्पन्न येईल त्यापैकी 20 टक्के रक्कम भारताच्या ‘वीर ट्रस्ट’साठी दान केलं जाईल.’ अक्षय कुमारने 4 सप्टेंबर रोजी या गेमची घोषणा केली होती.
FAU-G हा मोबाइल गेम अद्याप लाँच झालेला नाही, हा गेम Google Play Store वर प्री-रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध आहे. सुरूवातीला हा गेम केवळ अँड्रॉयड युजर्ससाठीच येण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु हा गेम अॅपल युजर्ससाठीदेखील लाँच केला जाईल अशीही चर्चा सुरु आहे.
हा गेम प्री-रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध करण्यापूर्वी कंपनीने या नावाचे बनावट गेम्स प्ले स्टोरवरुन हटवले आहेत. FauG गुगल प्ले स्टोअरवर प्री रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध करुन देताना कंपनीने काही गेम प्ले फोटोदेखील शेअर केले आहेत, ज्यावरून या गेमची थीम कशी असणार आहे, याचा आपण अंदाज बांधू शकतो.
संपादन : स्वप्नील पवार
- ब्रेकिंग : आता राज्यात पुन्हा होणार 5000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका; ‘या’ कालावधीत उडणार बार
- मोठी बातमी… राज्यात पुन्हा होणार निवडणुका; ‘यावेळी’ होणार 27 झेडपी, 20 महापालिका, 625 नगरपालिका व पंचायत समितीच्या निवडणूकांचा धमाका
- जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते खाद्यतेल आहे चांगले; वाचा महत्वाची माहिती
- घरच्याघरी बनवा ‘हे’ तेल आणि वेदनेपासून मिळवा मुक्ती
- व्हॉट्सअॅपवर मोदी सरकारची कठोर कारवाई; वाचा, नेमकं काय केलंय सरकारने