मोठी बातमी! RBI ने थांबवल्या ‘या’ दिग्गज बँकेच्या डिजिटल सेवा, नवीन क्रेडिट कार्ड मिळण्यावरही घातला निर्बंध

मुंबई :

केंद्रीय बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने खाजगी क्षेत्रातील महत्त्वाची आणि आघाडीची बँक असणार्‍या HDFC ला मोठा झटका दिला आहे. HDFC बँकेच्या डिजिटल सेवा थांबवण्याचे आदेश आरबीयायने दिले आहेत. गेल्या 2 वर्षांपासून बँकेला इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आणि पेमेंट युटिलिटी सेवांमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे, म्हणून आरबीआयने हा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे.

HDFC बँकेसह ग्राहकांनाही हा मोठा धक्का आहे. एवढेच नाही तर बँकेच्या Digital 2.0 या उपक्रमाअंतर्गत असणाऱ्या सुविधा आणि ग्राहकांसाठी नवीन कार्ड्स लाँच करण्याच्या सेवा थांबवण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये नवीन क्रेडिट कार्ड लाँच करण्यावरही बंदी आणली आहे.

अधिक माहिती वाचा मुद्देसूद :-

१)     आरबीआयची ही बंदी स्थायी स्वरूपाची नसून अस्थायी आहे. 

२)    गेल्या 2 वर्षातील ही तिसरी वेळ आहे, जेव्हा HDFC बँकेवर कोणत्या प्रकारचे निर्बंध आणण्यात आले आहेत.

३)    आरबीआयने प्राथमिक स्तरावर Digital 2.0 अंतर्गत असणारे सर्व डिजिटल बिझनेसचे लाँच यावर अस्थायी स्वरूपात स्थगिती आणली आहे, इतर आयटी अॅप्लिकेशन जनरेटिंगही करता येणार आहे.

संपादन : स्वप्नील पवार   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here