खाण्या-पिण्याच्या ‘या’ सवयी करतात रोगप्रतिकार शक्ती कमी; वाचा अधिक

सध्या आपण करोनासारख्या महारोगाला सामोरे जात आहोत. ज्यात रोगप्रतिकारशक्तीला अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थिती रोगप्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहोत. ज्यावर विश्वास ठेवणे थोडे कठीण जाईल. आपल्या दैनंदिन जीवनात आपण अशा काही सवयी बाळगतो की ज्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होते.

१) जास्त प्रमाणात मीठ सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. म्हणून जास्त तळलेले, नमकीन पदार्थ खाणे टाळा.

२) काम करताना उत्साही आणि फ्रेश वाटावे यासाठी बऱ्याचदा अती प्रमाणात कॉफी आणि चहा घेतला जातो. त्याचा थेट परिणाम पचनशक्तीवर होतो. परिणामी हळूहळू रोग प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते.

३) उभे राहून घाई गडबड करत अनेक जन पाणी पितात. ही सवय तुमच्या प्रतिकार शक्तीसाठी घातक आहे. कारण यामुळे तुमची फुफ्फुसे आणि किडनीवर चुकीचा परिणाम होऊ शकतो.

४) आजकालच्या आरामदायी जीवनशैलीमुळे अती प्रमाणात गोड पदार्थ खाण्यामुळे तुमच्या रक्तातील साखर वाढू शकते. यासाठीच गोडाधोडाचे प्रमाण आहारात कमी करा.

५) जी माणसं दररोज मद्यपान करतात त्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here