लहान मुलांसाठी बनवा पौष्टिक गाजर-टोमॅटो सूप; वाचा रेसिपी आणि नक्कीच ट्राय करा

लहान मुले हे खात नाहीत, ते खात नाहीत. त्यांचे नाना प्रकारचे हट्ट असतात. कधी कधी तर बनवायला सांगतात आणि खात नाही. परंतु त्यांना आवडेल असे आणि पौष्टिकही अशा गाजर टोमॅटो सूप रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
ही रेसिपी अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत बनते.

साहित्य घ्या मंडळीहो…
१) १ टोमॅटो
२) २ गाजर
३) एकदम छोटा कांदा
४) १ छोटा बटाटा
५) साखर

ते सगळं घरी सहजासहजी उपलब्ध असत, म्हणून ही रेसिपी तुम्ही लगेच ट्राय करू शकता. मग वाट कसली बघताय… करा की बनवायला सुरुवात

१) टोमॅटो, गाजर, कांदा व बटाटा सगळे दोन कप पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्या.

२) गार झाल्यावर मिक्सरमधून काढून मीठ घाला.

३) आता उकळून घ्या, आणि मुलांना खायला द्या.

महत्त्वाची टीप :- हे सूप साधारणतः दीड आणि दीड वर्षांपुढील मुलांना दयावे.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here