असा बनवा झणझणीत यम्मी टेस्टी पनीर कोलीवाडा; रेसिपी वाचा एका क्लिकवर

आजवर तुम्ही हॉटेलमध्ये पनीरचे अनेक पदार्थ खाल्ले असतील. त्यापैकी अनेक पदार्थ घरीही बनवायचा प्रयत्न केला असेल. मात्र हा पदार्थ अजून विशेष प्रसिद्ध नाही. हॉटेलमध्येही हा पदार्थ मिळत नाही. म्हणून या नवीन चवदार आणि झणझणीत पदार्थाची रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

साहित्य घ्या मंडळींहो.

 1. 1/4 चमचा गरम मसाला
 2. 1/2 वाटी बेसन
 3. 3/4 वाटी दही
 4. 1 चमचा कॉर्न फ्लार
 5. 250 gm पनीर
 6. 1 चमचा आलं लसूण
 7. 1/4 चमचा हळद
 8. 3/4 चमचा चाट मसाला
 9. 1/2 चमचा जिरेपूड
 10. 2 चमचे तेल
 11. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे चवीनुसार तिखट, मीठ

हे बनवायची पद्धत तर एकदमच सोपी आणि कमी वेळाची आहे. वरील साहित्य घेतलं असेल तर बनवायला पण घ्या की मंडळीहो…

 1. सगळे साहित्य एकत्र करून पनीर marinate करा.
 2. 15 मिनिटे तसेच ठेवा.
 3. मग गरम तेलात खरपूस तळून घ्या.

झाले तुमचे झणझणीत पनीर कोलीवाडा तयार..
आता हे पनीर कोलीवाडा टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता. तसेच चाट मसाला वापरूनही याची मस्त टेस्ट लागते.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here