तुमच्याकडे आहे एखादी आयडिया किंवा सूचना; सरकारकडे पाठविण्याची मिळालीय संधी, ‘या’ पद्धतीने पाठवा सरकारला

दिल्ली :

1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2021 सादर केला जाईल. तुम्हाला यासाठी एखादी सूचना पाठवायची असेल तर त्यासाठी एक पद्धत आहे.   सामान्य माणसांनीही याबाबत सूचना कराव्यात, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहेत तसेच सूचनाही मागविण्यात आल्या आहेत. म्हणजेच, सामान्य लोक कल्पना किंवा सूचना पाठवून 2021-22 च्या अर्थसंकल्पातही आपला सहभाग निश्चित करू शकतात. पूर्वी, याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2020 होती, परंतु आता आगामी बजेटसाठी 7 डिसेंबर 2020 पर्यंत सूचना पाठविण्याची संधी आहे.

2021-22 च्या अर्थसंकल्पाच्या चर्चेत जास्तीत जास्त लोकांचा सहभाग निश्चित करण्यासाठी सरकारने MyGov प्लॅटफॉर्मवर सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. म्हणजेच, बजेटसाठी जर तुम्हाला काही सूचना किंवा सल्ला सरकारपर्यंत पोहोचवायचा असेल तर आपण ते ऑनलाइन पाठवू शकता. सर्वसामान्यांच्या अधिकाधिक गोष्टींचा अर्थसंकल्पात समावेश करण्याकडे सरकारचे लक्ष आहे. 2021-22 च्या बजेटसंदर्भात सामान्य लोकांच्या वतीने MyGov वर त्यांच्या सूचना सबमिट केल्यानंतर भारत सरकारच्या संबंधित मंत्रालये किंवा विभागांद्वारे तपास केला जाईल.

2021 बजेटसाठी सूचना करण्यासाठी आपल्याला https://www.mygov.in/mygov-survey/inviting-suggestions-budget-2021-22/ वर भेट देणे आवश्यक आहे. येथे कॉमेंट बॉक्स विभागात सूचना सबमिट केल्या जाऊ शकतात. परंतु यासाठी प्रथम आपल्याला ईमेल आयडी किंवा मोबाइल क्रमांकाद्वारे लॉग इन करावे लागेल. या प्रक्रियेत, ओटीपी आपल्या मोबाइल नंबरवर येईल. यानंतर, आपण प्रक्रिया पूर्ण करू शकता आणि आपल्या सूचना सरकारकडे पाठवू शकता. वापरकर्ते त्यांच्या सोशल मीडिया खात्यांमधून फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन इत्यादीवरून लॉग इन करू शकतात.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here