म्हणून सोन्याच्या दरात पुन्हा झाली वाढ; वाचा काय आहेत आजचे भाव

दिल्ली :

आता उत्सवाचा हंगाम सुरु असून आता सोने खरेदी वाढली आहे, असे चित्र आहे. अशातच सोने-चांदीचे दर कमी- जास्त होताना दिसत आहेत. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या काळात सोन्याच्या आयातीमध्ये मोठी घट झाली आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून घसरत असणाऱ्या सोन्याच्या दरात कालपसून तेजी आली आहे.

जागतिक बाजारात मौल्यवान धातूंच्या किंमतींच्या वाढीचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावर झाला. सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 481 रुपयांनी वधारून 48,887 रुपये झाला. चांदीही 555 रुपयांनी वाढून 63,502 रुपये प्रति किलो झाली.

कोरोना लसीबाबत येणाऱ्या सकारात्मक वृत्तांमुळे लोकांचे लक्ष सुरक्षित गुंतवणुकीवरून हटले आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) तपन पटेल यांनी म्हटले आहे की,  अमेरिका आणि युरोपियन युनियनकडून प्रोत्साहन पॅकेजेस मिळण्याच्या आशेने सोन्याच्या किंमती वाढल्या. कोविड-१९ साथीच्या रोगाच्या लसीच्या मोहिमेवरही लक्षणीय पुढाकार घेण्यात आले आहेत. 

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here