जावयाने सासुरवाडीवर लिहिलेली ही भन्नाट कविता; वाचा आणि पोटभर हसा

आषाढीच्या महिन्यामंदी,

सासुरवाडीले गेलो.!

पंचपक्वानाचा पाहुणचार पाहून,

तब्बेतीले भेलो.!!

भजे-खीर अन पापडासंगं,

गावरान होतं तूप.!

सासूबाईनं ठरवलं आमच्या,

बदलावं जावयाचं रूप.!!

सालीच्या आग्रहा खातर,

जेवण झालं जास्त.!

पलंगावर बसल्या-बसल्या,

मले झोप लागली मस्त.!!

बायको मैत्रिणीले सांगे,

कसा झोपला माझा छावा.!

हात – पाय ताणून,

जसा निवडून आला भावा.!!

गप्पा गोष्टीच्या मैफिलीत,

वाजले रात्रीचे बारा.!

अन सासुरवाडीचं कौतुक पाहून,

आल्या डोयात धारा.!!

बायको म्हणे हिवायात,

येते हरभऱ्यावर खार.!

सारे तीरथ बार-बार,

अन सासुरवाडी एक बार.!!

  • श्रीकांत तायडे, (ग्राम:मोखा, जिल्हा: अकोला)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here