हसण्याचे हे आहेत फायदे; फायद्यासह अस्सल थुकरटवाडीचे जोकही वाचा आणि खळखळून हसा

हसणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. हसल्यामुळे माणूस काही काळ का होईना सर्व तणाव विसरून जातो आणि त्यामुळे त्यांना फ्रेश वाटते. हसणे कोणाला आवडत नाही, परंतु सध्याच्या काळात, आयुष्यात माणूस स्वत: साठी वेळ शोधू शकत नाही आणि बहुतेक वेळा जीवनाच्या शर्यतीत निराश होतो. अशा परिस्थितीत जर आपण एखादा विनोद किंवा उपहास वाचला तर आपण आपल्या सर्व तणावापासून मुक्त होतो आणि आपले मन आनंदित होते.

वाचा हे अस्सल अतरंगी जोक्स

  1. 1) दहावी पास झाल्यामुळे बाबांनी मुलाला हॉटेल मध्ये नेले.

    बाबा- “वेटर एक बियर और एक आईसक्रीम लाओ!!”

    मुलगा – “आईसक्रीम का बाबा..??
    तुम्ही पण बियर घ्या ना..”

    बाप खिडकीतून बाहेर बघतोय, पोराला फेकू कि स्वता उडी मारू?
  2. 2) मी: hey dad wassup?? पप्पा: मराठीत बोलायला लाज वाटते का रे ?

मी: ok ठीक आहे . मला जरा गरमकेंद्रबिंदु देता का ?
पप्पा: हे काय असत आता ?

मी: hotspot हो पप्पा
पप्पानी spot hot होइपर्यन्त धुतला

3) सासरेबुवांना बातमी लागते की मुलीच्या गावाला वादळ झालंय,

ते जावयाला फोन लावतात,

“काय जावईबापू वादळ काय म्हणतंय?”

जावई – “स्वयंपाक करतंय, फोन देऊ का”.. 

4) बाप: बाळा , मी तुझ्यासाठी एक छान मुलगी बघितली आहे…
ती रूपवतीआहे
भाग्यवती आहै
गुणवती आहै
ज्ञानवती आहै
समज सरस्वती आहै…!

बाळ: पण मी पहील्यापासुन एक मुलगी पसन्द केलीये आणि ती गर्भवती आहे.

5) पिंकीला बघायला एक मुलगा येतो,

मुलगा: तु दिसायला सुंदर आहेस,

पिंकी: धन्यवाद!

मुलगा: पण तुझ्या बापाची लायकी आहे का मला कार देण्याची?

आता मात्र आपल्या पिंकीची जाम सटकते,

पिंकी: माझ्या बापाची लायकी तर विमान द्यायची आहे,

पण तुझ्या बापाची लायकी आहे का विमानतळ बनवायची.. 

6) आई: “बंड्या आज काय शिकवले शाळेत.”

बंड्या: “लिहायला शिकवले.”

आई: “अरे वा छान! काय लिहले?”

बंड्या: “काय माहीत? अजून वाचायला नाही शिकवले….” 

7) जर तुमचा भाऊ/बहीण सकाळी झोपेतून उठत नसतील
तर सरळ त्याच्या/तिच्या कानात जाऊन बोलायचं…
.
.
.
.
बाबा तुझा मोबाईल चेक करताय बघा तुफान येईल तुफान 

8) बाबा: पोरी,मोठी झाल्यावर तू काय करणार आहेस?

मुलगी: काही नाही.
आई बनेन, शिक्षण घेईन, लग्न करीन. आणखी काय करणार?

बाबा: योजना चांगल्या आहेत तुझ्या बेटा.
फक्त जे काही करशील ते योग्य क्रमाने कर, म्हणजे झालं!!! 

9) मुलगा: तु… मला सांगितले नाही कि,

“तुझ्या अंगात देवी येते ते..”

मुलगी: What??

मुलगा: तुझे केस विस्कटलेले DP बघितला !

मुलगी: नालायका आंघोळ झाल्यानंतर काढलेला सेल्फी होता तो !

10) सुनबाई: सासूबाई कॅडबरी खाणार का ?

सासूबाई: नको बाई, मला कुठे “सात समुंदर “वर नाचता येतंय 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here