विधान परिषदेचा पहिला निकाल आला; भाजपने ‘इथे’ मारली बाजी

धुळे :

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठीचे निकाल आज लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे, ज्यामध्ये महाविकास आघाडी आणि भाजप पहिल्यांदाच समोरासमोर लढले आहेत. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती.

पहिला निकाल हाती आला असून धुळे – नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा भाजपाने धुव्वा उडविला आहे. भाजपचे अमरीश भाई पटेल हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. भाजपचे अमरीश भाई पटेल यांना 332 मते मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीचे अभिजित पाटील यांना 98 मते मिळाली. तर 4 मते बाद झाली आहेत.

राज्यात पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासह, नागपूर पदवीधर, औरंगाबाद पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात निवडणूक पार पडली. या निवडणुकीची मतमोजणी सकाळी आठ वाजेपासून सुरू झाली आहे. 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here