मुळात कोणतेही रोपटे मोठे होण्यासाठी त्याचे रोपटे लावावे लागते. रोपटे लावले, त्याला योग्य पद्धतीने खत-पाणी दिले, गरजेनुसार बुस्टर डोस दिले, योग्य वेळी फळांची काढणी केली आणि ताण दिलेला असतानाच किंवा दुष्काळ असताना त्या बागेला जगवले तरच पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात त्यापासून फळे मिळतात. हीच प्रक्रिया कोणत्याही उद्योग-व्यवसायाला लागू होते. तशीच चढउतार आणि खाचखळग्यांची व यशाची कथा आहे नेसले कंपनीची..!
लेखक : सचिन मोहन चोभे, संपादक, कृषीरंग
- फायद्याची माहिती : म्हणून महाराष्ट्रालाही गरज आहे भावांतर योजनेची; वाचा योजनेचे वैशिष्ट्ये
- तिथे मिळतेय ‘ओप्पो’वर 17 टक्क्यांपर्यंत दमदार सूट; पहा कुठे मिळेल +10% ऑफरही
- ऑफर : नो कॉस्ट EMI वरही मिळतेय सूट; पहा कुठे होऊ शकतोय HDFC कार्डवर 1500 रुपयांपर्यंत फायदा
- नाविन्यपूर्ण : सफल शेतीचा मूलमंत्र म्हणजे ‘फसल’; मोबाईलवर कळणार पिकाचे आरोग्य..!
- पाकिस्तान जिंदाबाद व मोदी विरोधाचा ‘तो’ व्हिडिओ खोटाच; शेतकरी आंदोलनास बदनाम करण्यासाठी वापर
मराठी माणसाची एक व्यावहारिक खासियत आहे. १० हजार रुपये प्रतिमाह देणाऱ्या नोकरीसाठी तो १० लाखांचीही गुंतवणूक करू शकतो. परंतु, १ लाख प्रतिमाह देणाऱ्या व्यवसायासाठी तो १ लाखही गुंतवणूक करायला धजावत नाही. मात्र, त्याच्याच उलट गुजराती व मारवाडी मंडळीचे उदाहरण आहे. तीच परिस्थिती जगभरात युरोपीय लोकांची आहे. ही मंडळी रोपटे लावतात, वाट पाहतात, सिंचन करतात आणि फळही चाखतात. नव्हे अवघ्या जगाला चाखायला लावतात. त्यातलीच एक सर्वांच्या जिभेचा ताबा घेतलेली कंपनी म्हणजे स्वित्झर्लंडची नेसले. २०१९ या आर्थिक वर्षामधील ही जगातील सर्वात मोठी पॅकेज फूड कंपनी आहे.
स्वित्झर्लंड म्हटले की आपल्याला आठवतात भूतलावरील स्वर्गीय वाटणारी सहलीची ठिकाणे, स्विस घड्याळे, स्विस बँक आणि त्यात पैसे ठेवणारे भारतीय राजकारणी व उद्योग जगतातील व्यक्ती. एकूणच स्विस प्रदेश म्हणजे भारताच्या जीवाभागाचा विषय. स्विस नावाने राजकारण केले जात असलेल्या या देशात १९०५ मध्ये Nestle ची स्थापना झाली. म्हणजे हे तिचे खरे जन्मवर्ष नाही. तर, त्यावेळी दोन कंपन्या एकत्र येऊन हा ब्रांड बनला. एक म्हणजे एंग्लो-स्विस मिल्क कम्पनी आणि दुसरी फरीन लैक्टी हेनरी नेस्ले कम्पनी..!
एंग्लो-स्विस मिल्क कम्पनी आणि दुसरी फरीन लैक्टी हेनरी नेस्ले कम्पनी या दोन्हींची स्थापना १८६६ ची. एक दुधाची, तर दुसरी लहान मुलांसाठी (बेबी फूड) सकस आहार बनवणारी. एंग्लो-स्विस होती जॉर्ज आणि चार्ल्स पेज या बंधूंची. तिलाच टेकओव्हर केले हेनरी नेस्ले यांनी आणि तयार झाली आताची नेसले कंपनी. म्हणजे हेनरी हे तिचे संस्थापक. हेनरी यांच्या शेजारी डॅनियल पीटर नावाचा एक माणूस राहायचा. कंड होता त्यांना अन्नप्रक्रियेचा. त्यात हा माणूस संशोधन करायचा. त्यांनीच बनवलेले फोर्म्युले आताही नेसले कंपनी वापरत आहे. मिल्क चॉकलेट आणि पावडर मिल्क त्यांनीच बनवले. संशोधक असलेल्या शेजाऱ्याच्या मदतीने उद्योगी असलेल्या हेनरी यांनी ही कंपनी सुरू केली.
- व्हॉट्सअॅपवर मोदी सरकारची कठोर कारवाई; वाचा, नेमकं काय केलंय सरकारने
- ‘त्या’ एका कारणामुळे जगभरात सिग्नल अॅप झाले डाउन; युजर्सने केली तक्रार
- अवघ्या 5 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळताहेत ‘हे’ टॉप 4 स्मार्टफोन; वाचा, जबरदस्त फीचर्सविषयी
- ‘या’ ई-कॉमर्स वेबसाइटची भन्नाट ऑफर; ‘या’ 12 स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी
- व्हाटस्अपने टाकली नांगी; युझर्सच्या झटक्यापुढे कंपनी हतबल, पॉलिसीबाबत म्हटले असे
हेनरी हे १८३४ मध्ये फ्रँकफुर्ट फार्मसी यामध्ये काम करायचे. पण आपलाच वेगळा व्यवसाय सुरू करण्याच्या उर्मीने त्यांनी फरीन लैक्टी हेनरी नेस्ले कम्पनीचे रोपटे लावले. तेंव्हा त्यांचे वय २२ वर्षे होते. (जन्म १० ऑगस्ट १८१४) १८४३ मध्ये त्यांनी कार्बोनेटेड मिनरल वॉटर आणि दारूच्या सेक्टरमध्ये काही केले. तर, १८५७ मध्ये शेतीचे खत बनवण्यातही डोके लावले. एखादा उद्योजक एकाच दोरीत चालून यश मिळवत नसतो. त्याला इतरही फाटे फुटतात आणि जो फाटा मोठा होतो त्यातच मग तो पुढे जातो. हीच प्रक्रिया असते पुढे जाण्याची. आपल्याकडे २-४ वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करायलालागला की तो डोक्यात लागलाय असे म्हटले जाते. तर, मित्रांनो हेनरीसुद्ध असेच होते. कदाचित त्यांनाही तिथे काहीजण भरकटलेला म्हटले असतील. ७ जुलै १८९० ला वयाच्या ७५ व्हा वर्षी हेनरी यांनी जगाचा निरोप घेतला. मग त्यांच्या कौटुंबिक व व्यावसायिक वारस असलेल्यांनी ही कंपनी पुढे नेली.
अशा पद्धतीने प्रवास करीत १९०५ मध्ये नेसले उभी राहिली. मग यांनी इतर अनेक कंपन्या आपल्या नेसलेमध्ये घेण्यास सुरुवात केली. त्यांनी १८८४ मध्ये स्थापन झालेली ‘मॅगी’सुद्धा विकत घेतलेलीच आहे. आपण तेच उत्पादन आता रोजच्यारोज चाखतो. पहिल्या जगती विश्वयुद्धात व्यवसायाला फटका बसायला लागल्यावर त्यांनी सरकारी बिजनेस फोकस केला. १९१९ मध्ये त्यांनी कंडेन्स मिल्कवाली एक कंपनी विकत घेतली. सीइओ ल्युईस देपल्स आणि एडवर्ड म्युलर यांनी मग १९५० पर्यंत ही कंपनी जगात नेली. दुसऱ्या महायुद्धात कंपनीला मोठा फटका बसला. मात्र, त्याचवेळी सैनिकांना बेस्ट कॉफी देण्याची त्यांची कल्पना चालली आणि कंपनीलाही बुस्टर डोस मिळाला.
- फायद्याची माहिती : म्हणून महाराष्ट्रालाही गरज आहे भावांतर योजनेची; वाचा योजनेचे वैशिष्ट्ये
- म्हणून पंजाबी शेतकरी आहेत श्रीमंत; पहा कशासाठी नेमके त्यांचे आंदोलन चालू आहे ते
- पांढरेच नाही तर रंगीतही सोने; पुन्हा फुलणार भारतात रंग, पहा नेमके काय संशोधन झालेय ते
- शाबास रे पठ्ठ्या : आंदोलक शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी ‘त्यांनी’ दिला आमदारकीचा राजीनामा..!
- मोदी सरकारला झटका; पहा नेमके काय म्हटलेय सर्वोच्च न्यायालय
१९९० पर्यंत कंपनीने जगातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवणाऱ्या कंपन्या ई त्यांचे फोर्म्युले विकत घेतले. त्याला संशोधन, अभ्यास व मार्केटिंग यांची जोड देऊन जगभरात विस्तार केला. भारतातही ही कंपनी १९१२ पासून व्यवसाय करीत आहे. मागील काही काळात त्यांना अडचानीय आणण्याचे शेकडो प्रयत्न झाले. त्यांच्याही काही चुका झाल्या. मात्र, कंपनी प्रशासनाने त्यातून मार्ग काढला. आता आपल्याकडे त्यांची नेसकॅफे, मॅगी, मिल्कीबार, किटकॅट, बार-वन, मिल्कमेड मायलो असे ब्रांड आहेत. मला तरी सध्या इतकेच आठवतात. इतरही भरपूर ब्रांड आहेत त्यांचे.. आणि जगभरातील एक बलाढ्य ब्रांड म्हणून नेल्से कंपनीची ओळख आणखी पक्की झालेली आहे.
ता. क. अगोदरचा कंटेंट काही तांत्रिक कारणाने पोर्टलवर उपलब्ध नसल्याने वाचकांच्या आग्रहास्तव पुन्हा प्रकाशित करीत आहोत.
ता. क. : आपल्याकडे कोणतीही ठोस कल्पना असेल तर आम्ही त्याला साकार करू. कंपनी नोंदणी, ट्रेडमार्क, तंत्रज्ञान सल्ला आणि उद्योग मार्गदर्शन यासाठी आम्हाला ९४२२२१५६५८ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. व्हाटस्अॅप मेसेज केल्यास उत्तम. (सल्ला व मार्गदर्शन मोफत नसेल. तसेच कोणता उद्योग करावा यासाठी सल्ला मागायला अजिबात फोन करू नये. व्यवसाय आपण निवडावा. आपली बौद्धिक व आर्थिक क्षमता आणि जोखीम पत्करण्याची तयारी यानुसार व्यवसाय निवडावा. आम्ही त्यासाठीचे तांत्रिक मार्गदर्शन करू.)
- ब्रेकिंग : आता राज्यात पुन्हा होणार 5000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका; ‘या’ कालावधीत उडणार बार
- मोठी बातमी… राज्यात पुन्हा होणार निवडणुका; ‘यावेळी’ होणार 27 झेडपी, 20 महापालिका, 625 नगरपालिका व पंचायत समितीच्या निवडणूकांचा धमाका
- जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते खाद्यतेल आहे चांगले; वाचा महत्वाची माहिती
- घरच्याघरी बनवा ‘हे’ तेल आणि वेदनेपासून मिळवा मुक्ती
- व्हॉट्सअॅपवर मोदी सरकारची कठोर कारवाई; वाचा, नेमकं काय केलंय सरकारने