अबबब… LPG स्वयंपाकाचा गॅस ‘एवढ्या’ रुपयांनी महागला; वाचा काय आहेत नवे दर

मुंबई :

सध्या महागाई वाढते आहे. कोरोनामुळे बसलेल्या आर्थिक संकटाच्या झटक्यातुन अजून लोक सावरलेले नाहीत. आता अशातच LPG स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे नवे दर समोर आले आहे. आपल्या घरात इतर कुठलीही गोष्ट नसली तरी चालते सिलेंडर मात्र हवा असतो. आता अशातच आजपासून एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महाग झाला आहे. 

वाढती महागाई, आर्थिक संकट आणि अशातच जीवनावश्यक वस्तूंचे वाढते दर खिशाला कात्री लावणारे आहेत. यापूर्वी जुलैमध्ये 14 किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. जुलैमध्ये 4 रुपयांनी किंमतीत वाढ करण्यात आली. तर जूनमध्ये दिल्लीमध्ये 14.2 किलो विना अनुदानित एलपीजी सिलिंडर 11.50 रुपयांनी महागले होते, तसेच मे मध्ये ते 162.50 रुपयांनी स्वस्त झाले होते.

किंमती वाढल्यानंतर दिल्लीत एलपीजीची किंमत 644 रुपयांवर गेली आहे. 1 डिसेंबर रोजीच तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक गॅसचे दर वाढविले होते. 19 किलो सिलिंडरच्या किंमतीत 55 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. कोलकाता आणि मुंबईतही 55 रुपयांची वाढ झाली आहे. त्यानंतर या दोन शहरांत नवीन दर अनुक्रमे 1351 आणि 1244 रुपये आहेत.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here