म्हणून सोन्याच्या दरात पुन्हा झाली वाढ; ओलांडला ‘हा’ टप्पा, वाचा काय आहेत आजचे भाव

दिल्ली :

आता उत्सवाचा हंगाम सुरु असून आता सोने खरेदी वाढली आहे, असे चित्र आहे. अशातच सोने-चांदीचे दर कमी- जास्त होताना दिसत आहेत. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या काळात सोन्याच्या आयातीमध्ये मोठी घट झाली आहे. अशातच गेल्या आठवड्यापासून घसरत असणाऱ्या सोन्याच्या दरात आज तेजी आली आहे. सोन्याच्या किमतीने 48 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.  

जगभरातील मौल्यवान धातूंच्या किंमतींच्या वाढीचा परिणाम भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतींवर दिसून आला. बुधवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याची किंमतीत पुन्हा एकदा 675 रुपयांची भक्कम वाढ झाली आहे. सोन्याचा किंमत प्रती दहा ग्रॅम  48,169 रुपये झाली. सोन्याच्या वाढीबरोबरच चांदीची चमकही वाढली. एकाच दिवसात चांदीची किंमत 1280 रुपयांनी वाढून चांदीचा दर 62,496 रुपये प्रति किलोवर पोहोचला.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) तपन पटेल यांनी म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. बुधवारी, किंमत औंस $ 1,800 च्या वर राहिली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 1,815 डॉलर आणि चांदी 23.80 डॉलर प्रति औंस होता.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here