स्विफ्टपेक्षा कमी किमतीत मिळतेय ‘ही’ जबरदस्त एसयूव्ही; ब्रेझा, सॉनेट, नेक्सनला देणार टक्कर

पुणे :

निसान कंपनीने बुधवारी आपली नवीन सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही मॅग्नाइट लॉन्च केली. दिल्लीत या कारची सुरुवातीची किंमत 5.54 लाख रुपये आहे. तथापि, कंपनीने 31 डिसेंबर 2020 पर्यंत निसान मॅग्नाइट बुक करून सर्व ग्राहकांसाठी प्रारंभिक किंमत 4.99 लाख रुपये ठेवली आहे. अशा प्रकारे, ही भारतातील सर्वात स्वस्त एसयूव्ही आहे. त्याचे बुकिंग निसानच्या अधिकृत वेबसाइटवरून करता येते. 11000 रुपयांच्या बुकिंग रकमेत निसान मॅग्नाइट बुक करता येते.

निसान मॅग्नाइटच्या किंमतींबद्दल माहिती देताना निसान इंडियाचे एमडी राकेश श्रीवास्तव म्हणाले की, 31 डिसेंबर २०२० पर्यंत बुकिंग करणार्‍या सर्व ग्राहकांसाठी 4.99 लाख रुपये प्रारंभिक किंमत  आहे. श्रीवास्तव म्हणाले की, ग्राहकांना मॅग्नाइटमध्ये तीन खास वैशिष्ट्ये, आल राउंड व्यू मॉनिटर, वायरलेस कारप्ले आणि 7 इंचाचा डिजिटल डिस्प्ले मॉनिटर मिळतील.

ऑक्टोबरमध्ये मॅग्नाईटचे अनावरण भारतात झाले. निसान मॅग्नाईटची विक्री प्रथम भारतात सुरू होईल, नंतर ती जागतिक बाजारात विक्रीसाठी आणली जाईल. या एसयूव्हीची स्पर्धा मारुती सुझुकी विटारा ब्रेझा, ह्युंदाई वेन्यू, टाटा नेक्सन, फोर्ड इकोस्पोर्ट, महिंद्रा एक्सयूव्ही 300, टोयोटा अर्बन क्रूझर, होंडा WR-V आणि नव्याने सुरू झालेल्या किआ सोनेटशी होणार आहे.

निसान मॅग्नाईटला दोन इंजिन पर्याय मिळतील. पहिला B4D नैसर्गिकरित्या एस्पर्टेड 1.0 लिटर पेट्रोल इंजिन असेल आणि त्याच्याबरोबर निसानची ड्युअल व्हीव्हीटी सिस्टम असेल. हे इंजिन 72 hp पॉवर आणि 96 नमः पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल

18.75 चे मायलेज ही एसयुव्ही देईल. यासह ट्रान्समिशन 5 स्पीड मॅन्युअल असेल. दुसरा पर्याय 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असेल, जो 100 hp पावर जनरेट करेल. 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह हे इंजिन 160 एनएम टॉर्क आणि २० चे मायलेज देईल, तर सीव्हीटी गिअरबॉक्स 152 एनएम टॉर्क आणि 17.7 केपीएल मायलेज देईल.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here