असा बनवा भन्नाट चवदार ‘अंडा खिमा घोटाळा’; रेसिपी वाचा एका क्लिकवर

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा काय वेगळाच पदार्थ, धड अंडेही नाही, धड पावभाजीसारखा घोटाळाही नाही आणि धड खिमाही नाही. पण तुम्ही बनवून खाल्ल्यावर हा पदार्थ किती चवदार आणि बढिया आहे हे तुम्हाला कळेल. म्हणूनच बनवायला घ्या की मंडळीहो.. नॉनव्हेज प्रेमींसाठी हि खास रेसिपी आणि हा खास पदार्थ.

साहित्य घ्या की मंडळी.

 • २ कच्ची अंडी आणि ३ उकडलेली अंडी
 • १ मोठा कांदा = ९० ग्रॅम्स बारीक चिरलेला
 • २ मध्यम टोमॅटो =१२५ ग्रॅम्स बारीक चिरलेले
 • २-३ टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरलेली
 • १ हिरवी मिरची बारीक चिरलेली
 • १ टेबलस्पून आले लसणाची पेस्ट
 • अर्धा टीस्पून जिरे
 • पाव टीस्पून हळद
 • १ टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड
 • १ टीस्पून धणे पावडर
 • १ टीस्पून पाव भाजी मसाला
 • १ टीस्पून चाट मसाला
 • मीठ चवीनुसार
 • तेल

आता हे साहित्य घेतले असेल तर बनवायला पण घ्या की… 

 1. एका कढई मध्ये ३ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे . त्यात जिरे घालून तडतडू द्यावे . हिरव्या मिरच्या व कांदा घालून मध्यम ते मोठ्या आचेवर नरम होईपर्यंत परतून घ्यावे .
 2. मग आले लसणाची पेस्ट घालून त्यात थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी . पेस्टचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत परतून घ्यावी .
 3. आता चिरलेले टोमॅटो घालून त्यात थोडे मीठ घालावे . आच बारीक करून टोमॅटो मंद आचेवर शिजू द्यावेत .
 4. टोमॅटो शिजले की हळद, लाल मिरची पूड , धणे पावडर , पाव भाजी मसाला आणि चवीपुरते मीठ घालून हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा .
 5. ७-८ मिनिटे मसाला परतून घेतला की त्यात थोडे पाणी घालावे . किसणीने ( मध्यम आकारांच्या छिद्राने ) उकडलेली अंडी किसून घालावीत .
 6. अंडी चमच्याने व्यवस्थित मॅश करून घ्यावीत . मग आच मंद करून एक कच्चे अंडे फोडून घालावे. नीट एकत्र करून अजून थोडे पाणी घालावे ( टोटल १ कप पाणी वापरले आहे ) . वरून चाट मसाला भुरभुरावा . झाकण घालून मंद आचेवर शिजू द्यावे .
 7. दुसऱ्या आचेवर एका पॅन मध्ये १-२ टेबलस्पून तेल घालावे . त्यात उरलेले कच्चे अंडे फोडून घालावे. त्यावर मीठ, चाट मसाला आणि थोडी चिरलेली कोथिंबीर घालावी . बाजूने गरम तेल चमच्याने वर घालावे म्हणजे अंडे वरूनही शिजेल .
 8. अंड्याची ग्रेव्ही आपण ५ मिनिटे शिजू दिलीय . त्यात आता हे अंड्याचे फुल्ल फ्राय घालावे . ते नीट एकत्र करून घ्यावे .
 9. या रेसिपीमध्ये आपण अंडे ३प्रकारे वापरली – कच्चे , उकडलेले आणि फुल्ल फ्राय म्हणूनच हा घोटाळा एकदम मजेशीर आहे .

हा अंडा खिमा घोटाळा थोडासा दाटसर रस्साच असावा कारण आपल्याला तो पावासोबत खायचा आहे . त्यात आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एक्कत्र करावी. अंडा घोटाळा भाजलेल्या पावांसोबत आण्यासाठी घ्या.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here