या विनोदी चारोळ्या वाचून हसून हसून पोट दुखेल…

कॉलेजमध्ये कुणी नाही पटली
तर गल्लीत आपली ‘मालू’ आहे
कट्ट्यावरचा प्रत्येकजणच तसा
थोडाबहूत चालू आहे….!

स्वप्न मलाही पडतात, पण
त्यांच्या मागे मी धावत नाही
माझ्या आठ बाय दहाच्या खोलित
राजवाड्याचा दरवाजा मावत नाही

अतुल पूर्व राहुल हेमंत
मित्र माझे केवढे
एक जण फक्त ज्युस पितो
बाकी पक्के बेवडे.

माझ्या बायकोचा बाप
म्हणजे माझा सासरा
त्याचा पैसा आणि मुली
याचाच मला आसरा

तुमचे वडील गरीब असतील,
तर ते तुमचं दुर्भाग्य …
पण तुमचा सासरा गरीब असेल,
तर तो तुमचाच गाढवपणा……..!!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here