झोपेच्या समस्येने त्रस्त आहात; सैन्यदलाची ‘ही’ पद्धत वापरा, २ मिनिटात येईल झोप

झोप ही मानवाची सर्वात मोठी गरज आहे. विशेष म्हणजे जे सुख झोपेत आहे ते इतर कशातच नाही, असेही बडे बडे तत्वज्ञानी मंडळी सांगून गेले आहेत. कॉलेजवयीन मुलांपासून तर कॉमन मॅन आणि रिटायर्ड झालेल्या  वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत अनेक लोक मनसोक्त, गाढ झोप घेत/भेटत/येत नाही. …साला झोप नाही झाली राव, झोपच येत नाही भो…असे अनेक वाक्य आपण नेहमीच विविध लोकांच्या तोंडून ऐकत असतो. मात्र हे वाचून तुम्ही हैराण व्हाल की तुमची झोप पूर्ण होत नसेल तर तुम्हाला गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते.

तर आज आम्ही आज आम्ही तुमच्या झोपेवर उपाय सांगणार आहोत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकन लढाऊ विमानांचे पायलट्स निद्रानाशाच्या समस्येने त्रस्त झाले होते. ही गोष्ट लक्षात घेऊन अमेरिकन नेव्ही परी-फ्लाईट स्कुलच्या एका वैज्ञानिकाने यावर एक उपाय शोधला. हा उपाय जरी वैमानिकांसाठी शोधला असला तरी निद्रानाशाच्या समस्येने त्रस्त असणाऱ्या सर्वसामान्य लोकांनाही हा उपाय दैनंदिन जीवनात वापरता येऊ शकतो.

बिछान्यावर झोपल्यानंतर सर्वप्रथम आपले डोळे बंद करा आणि आपले लक्ष चेहऱ्यावर केंद्रित करा. हळूहळू आणि खोल श्वासोच्छ्वास सुरू करा. श्वास बाहेर सोडताना आपले गालावर लक्ष केंद्रित करा. तोंड, जीभ आणि जबडा सैल सोडा. डोळेही सैल सोडा. डोळ्यांच्या खोलपणावर लक्ष केंद्रित करा.

यामुळे आपल्या शरीराला सिग्नल मिळेल की आता विश्रांती घेण्याची वेळ आली आहे. आता हळू हळू आपले खांदे सैल करा. गळ्याच्या मागच्या बाजूला आराम द्या.

आपले हात सैल सोडत असताना आता आपल्या उजव्या हाताकडे लक्ष द्या. उजवा दंड हळूवारपणे सैल सोडा. डाव्या हातासोबतही हीच क्रिया करा. हळूवारपणे हाताच्या बोटांनाही विश्रांती द्या. हात झाल्यानंतर पायावर लक्ष केंद्रित करा. उजव्या पायाची मांडी, पोटरी आणि बोटांना आराम द्या. आता डाव्या पायाबाबतही हीच कृती करा. आता या मार्गाने आपल्या चेहऱ्यापासून पायापर्यंतच्या सर्व स्नायूंना आराम मिळाला आहे. कसलाही ताण राहिला नाही.

संपूर्ण शरीर सैल सोडल्यानंतर आपले लक्ष मनावर केंद्रित करा. पुढील १० सेकंद मनाला पूर्णपणे शांत करा. जसे काही चारी बाजूला अंधारच आहे, काहीच दिसत नाही असा विचार करा. दुसर्‍या कशाचाही विचार मनात आणू नका. दिवसभर काय घडले आणि काय नाही घडले याचा विचार करू नका.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here