म्हणून पालथे किंवा पोटावर झोपणे टाळा; अन्यथा…

अनेक जन कामावरून थकून आले की लगेच अंग टाकून देतात. शरीराला आराम गरजेचा असतो. म्हणून अनेकांना कामावरून आलं की बेडवर जाऊन पोटावर किंवा पालथे झोपायची सवय लागलेली असते. खरे तर आपल्या दृष्टीने ती अत्यंत आरामदायी झोपण्याची क्रिया असली तरी प्रत्यक्षात मात्र ते आपल्या शरीरासाठी त्रासदायक ठरणारे असते. तसेच मानसिकरीत्याही ते घातक ठरू शकते. रात्रीचेही अनेक जन पोटावर झोपत असतात.

  • पोटावर झोपल्याने मणक्याला त्रास होऊ शकतो. सोबतच छातीवरही ताण येतो.
  • पोटावर झोपण्याची सवय असेल तर नियमित या स्थितीत झोपल्याने मणक्याला कर्व्ह येतो. परिणामी मणक्याचे आजार वाढतात.
  • पोटावर झोपताना मान एका बाजूला वळवली जाते यामुळे मानेचे दुखणे, आखडणे असा त्रास होऊ शकतो. 

हे आहेत उपाय :-

  • किमान 8 तासाची झोप आवश्यक आहे.  झोपताना थेट पोटावर झोपण्याऐवजी एका कुशीवर झोपावे. डाव्या कुशीवर झोपणे उत्तम.
  • पोटावर झोपल्याने होणारा त्रास टाळण्यासाठी पाठीवर किंवा कुशीवर झोपण्याची सवय लावा. हळूहळू तुम्हांला एका कुशीवर झोपण्याची सवय होईल. 

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here