म्हणून भाजप नेते नितेश राणेंना बँकेने पाठवली जप्तीची नोटीस; वाचा संपूर्ण प्रकरण थोडक्यात

मुंबई :

शिवसेना आणि राणे कुटुंबिय यांचा वाद अवघ्या महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही चिरंजीव माजी खासदार नीलेश आणि आमदार नितेश यांच्याकडून शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियांवर नेहमीच टीका करण्यात येते. आता अशातच भाजप नेते नितेश राणेंना बँकेने पाठवली जप्तीची नोटीस पाठवली असल्याचा खळबळजनक खुलासा शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.

नाईक यांनी म्हटले की, काही वर्षांपूर्वी आपल्या इनोवा कार आणि इतर बारा बोलेरो गाड्यांसाठी नितेश राणे यांनी जिल्हा बँकेकडून कर्ज घेतले होते. पण सदर वाहनांची रक्कम अजूनपर्यंत बँकेकडे जमा झालेली नसल्यामुळे जिल्हा बँकेकडून नितेश राणे आणि संबंधित जामीनदारांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.

पुढे बोलताना नाईक यांनी स्पष्ट केले की, संबंधित वाहन मालक आणि जामीनदार यांना कर्जाचे हप्ते वेळेवर न भरल्यामुळे वारंवार नोटीसा पाठवूनही थकबाकीची रक्कम अदा न करण्यात आल्यामुळे जिल्हा बँकेने काही काळ उलटल्यानंतर संबंधित वाहन मालक आणि जामीनदारांना १०१ ची नोटीस पाठवून गाड्या जप्तीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, भाजप खासदार नारायण राणे यांना अडचणीत आणणारे मोठे विधान शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केले आहे. नारायण राणे यांच्या संपत्तीची ईडीने चौकशी करावी, अशी मागणी विनायक राऊत यांनी केली आहे. राऊत यांच्या या मागणीमुळे राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here