आज संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल; वाचा, काय आहे आहे कारण

मुंबई :

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत आज लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. आता त्यांच्यावर अजून एक अँजिओप्लास्टी (Angioplasty) शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ही शस्त्रक्रिया उद्या होईल.

दरम्यान राऊत यांना काहीसा ताण आणि थकवा जाणवत आहे. तशी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. राऊत यांनी शनिवारी लीलावती रुग्णालयात आरोग्य तपासणी केली होती. मागच्या वर्षी राऊत यांच्या हृदयात दोन ब्लॉकेजस आढळले होते. नंतर लीलावती रुग्णालयात त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली. 

मोठ्या प्रमाणात कामात व्यस्त असणारे राऊत खासदारपद, पक्षाचे मुख्य प्रवक्ते, ‘दैनिक सामना’चे कार्यकारी संपादकपद, महाविकास आघाडीचे शिल्पकार अशा विविध भूमिका पार पाडत असतात. मागच्या वेळी लीलावती रुग्णालयात डॉ. मॅथ्यू यांनीच संजय राऊतांची अँजिओप्लास्टी केली होती. आता डॉ मॅथ्यू आणि डॉ अजित मेनन यांच्या मार्गदर्शनाखाली संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. 

अँजिओग्राफी म्हणजे काय :-

हृदयविकाराच्या आजाराचे निदान करण्यासाठी जी चाचणी केली जाते त्याला अँजिओग्राफी म्हणतात. हृदयविकार आहे की नाही हे या चाचणीतून स्पष्ट होतं. त्यानंतर उपचाराची दिशा ठरवली जाते. ही चाचणी सोपी, सुरक्षित आणि पाच ते दहा मिनिटांत पूर्ण होणारी आहे. रुग्ण पूर्णवेळ जागा असतो केवळ लोकल अॅनेस्थेशियाच्या खाली ही चाचणी केली जाते. इतकंच नाही तर या तपासणीदरम्यान डॉक्टर रुग्णाशी संवादही साधत असतो. 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here