म्हणून अगदी 4 रुपये प्रती किलोपर्यंत कोसळले पेरूचे दर; ‘हे’ आहे कारण

इंदोर :

पेरूच्या बागांवर एवढा खर्च करूनही आता पेरू उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी पेरूवर चुरडामुरडा रोगाचा प्रादुर्भाव सुरु झाला आहे तसेच ढगाळ वातावरणाच्या बदलामुळे आता पेरूच्या फळाला गळती लागली आहे. मात्र काही ठिकाणी पीक जोरदार असूनही बाजरात त्याला भाव मिळत नाहीये. परिणामी लॉकडाऊन मध्ये आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी अजूनच खोलात रुतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत होता. ज्यात दिसत होते की काही शेतकरी जोरदार टिपूर असलेला ताजा पेरु कचर्‍याच्या गाडीत टाकत आहेत. शेतकर्‍यांवर ही वेळ का आली? याविषयी सांगताना पेरु उत्पादक शेतकर्‍यांनी संगितले की, यावर्षी पेरूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल आहे. यावर्षी कोरोनामुळे गावोगावी जाऊन पेरु विकणे, किंवा आठवडे बाजारात विकणे शक्य नाही. म्हणून थेट तालुक्याच्या बाजारात पेरूची विक्री करण्यासाठी शेतकरी जात आहेत मात्र तिथेही अगदीच प्रतिकिलो ४ ते १० रुपये दर मिळत आहे.   

यंदा पेरूचे मोठ्या प्रमाणावर पीक आल्यामुळे पेरूच्या किंमती घसरल्या असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, असे मत कृषी क्षेत्रातील तज्ञ मंडळींनी संगितले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, घसरलेल्या किंमतींमुळे बाजारात माल परत नेण्यासाठीचा वाहतूक खर्चही परवडणारा नाही. म्हणून शेतकरी बाजारात मालच आणत नाहीयेत. जे काही शेतकरी अपेक्षा ठेऊन बाजारात येत आहेत ते सुद्धा बाजारात विक्रीसाठी आणलेला मालही तसाच सोडून जात आहेत. 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here