पुणे :
नुकतीच 2 दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीरम इन्स्टिट्यूटल भेट देऊन लस बनवण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेतला होता. या भेटीच्या दुसऱ्याचं दिवशी हैदराबाद येथील एका रुग्णाने ‘कोविशील्ड’ लस घेतल्यामुळे आपल्या शरीरावर दुष्परिणाम झाल्याचा दावा केला आहे. त्यापोटी 5 कोटी रुपये नुकसान भरपाई त्याने मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान सीरम संस्थेने हे आरोप फेटाळून लावले आहेत. कंपनीचा असा दावा आहे की, तक्रारीचा तपास करणार्या पथकाला ही तक्रार चुकीची वाटली आहे.
चेन्नईच्या एका स्वयंसेवकांनी या लसीबाबत नकारात्मक दावा केल्यावर, मंगळवारी सीरम संस्थेने एक निवेदन जारी करून लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की लस बनवताना सर्व नियामक आणि नैतिक प्रक्रिया आणि मार्गदर्शक तत्वे पाळली गेली आहेत. तक्रारीनंतर डीएसएमबी आणि नीतिशास्त्र समितीने(डीएसएमबी और एथिक्स कमेटी) एक तपासणी केली. त्यात असे आढळले की स्वयंसेवकांनी केलेले आरोप लस चाचणीशी संबंधित नाहीत.
नेमकं काय आहे प्रकरण :-
सध्या लसीचा प्रयोग करण्यासाठी अनेक स्वयंसेवक निवडले जात आहेत. सिरमच्या लसीची सध्या चेन्नईमधील काही स्वयंसेवकावर चाचणी केला जात आहे. दरम्यान एका 40 वर्षीय व्यक्तीनं लशीचे डोस घेतल्यानंतर 11 ऑक्टोबर रोजी आपल्या शरीरावर झालेले दुष्परिणाम नोंदवले. त्याला या लशीचा डोस घेतल्यानंतर व्हर्च्युअल न्यूरोलॉजिकल ब्रेकडाउन (neurological breakdown) सारख्या समस्यांचा जाणवल्या. याची भरपाई नुकसान भरपाई म्हणून सीरम संस्थेनं 5 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
संपादन : स्वप्नील पवार
- ‘त्या’ गावात माजी आमदार आणि पत्नीचे पॅनल होते एकमेकांविरुद्ध; ‘असा’ लागला ऐतिहासिक निकाल
- पुछता है भारत, क्या बोलेगी सरकार : मग समजेल अर्णब-सरकार संबंधातला दुवा नेमका कोण?
- जगातील ‘हे’ 3 महाराजे होते भलतेच प्रसिध्द; ‘विचित्र’ गोष्टींसाठी खर्च करायचे पाण्यासारखा पैसा
- म्हणून सुरू झाले भावनांचे ‘तांडव’; UP पोलिसांची टीम मुंबईत दाखल
- कोट्यावधी रुपयांचे मालक असलेले ‘हे’ 5 क्रिकेटर्स आहेत फक्त 10 वी किंवा 12 वी पास; इतर नावे वाचून व्हाल शॉक