योगींचा महाराष्ट्राला झटका; मुंबईत येऊन केली आहे ‘ही’ मोठी तयारी

उत्तरप्रदेश राज्यातील वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी थेट मुंबईचे बॉलीवूड युपीत नेण्याची तयारी केली आहे. त्यासाठी त्यांनी मुंबईत येऊन अक्षयकुमारसह अनेक दिग्गज बॉलीवूड कलाकारांना भेटीसाठी निमंत्रित केले आहे.

चित्रपट क्षेत्रातील मुंबईची मक्तेदारी मोडीत काढून उत्तरप्रदेश राज्याला बॉलीवूड हब बनविण्याचे स्वप्न योगी सरकारने पाहिले आहे. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी बैठका घेतल्या आहेत. अनेक कलाकारांना राज्यात बोलावून संवाद साधला आहे. आताही त्यांनी थेट मुंबईत येऊन यासाठी फिल्डिंग लावली आहे.

एका अर्थाने महाराष्ट्र राज्यातील मुंबई या शहराची असलेली मक्तेदारी मोडीत काढून रोजगार वृद्धीचा हा मोठा प्रयत्न आहे. त्यामुळे काँग्रेस नेते व मंत्री अशोक चव्हाण यांनी योगींच्या या प्रयत्नाला बॉलीवूड का एक तुकडा लेकर जाने की पटकथा असे म्हणून टीका केली आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here