‘या’ 4 मोबाईल कंपन्यांपासून भारतीय आहेत संतुष्ट; ‘या’ कंपनीने टॉपला मारली बाजी, वाचा आश्चर्यचकित करणारा रिसर्च

दिल्ली :

मेट्रो आणि टियर -१ शहरांतील प्रत्येक चार स्मार्टफोन वापरकर्त्यांपैकी एकाला फोन विकत घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत सर्विस सेंटरला जावे लागते, वारंटी संपलेल्या फोनला नीट करण्यासाठी सरासरी 2400 रुपये खर्च करावे लागतात. रिसर्च फर्म काउंटरपॉईंटच्या अहवालामध्ये हे उघड झाले आहे. हा अहवाल ग्राहकांच्या पाहणीवर आधारित आहे. या अहवालात असे आढळले आहे की ओप्पो, झिओमी, विवो आणि सॅमसंगचे सर्वाधिक ग्राहक त्यांच्या सेवेवर समाधानी आहेत. फोनची विक्री केल्यावर जी सेवा मिळते त्याबाबतच हा अहवाल आहे.

या सर्वेक्षणात अहमदाबाद, चेन्नई, बेंगलुरू, नोएडा, कोलकाता यासारख्या शहरातील अधिकृत सेवा केंद्रांना भेट देऊन सेवा पूर्ण केलेल्या हजारो ग्राहकांशी संवाद साधून हा अहवाल तयार केला गेला.

यात संतुष्ट ग्राहकांच्या संख्येमध्ये ओप्पोने अव्वल स्थान मिळविले. 93 टक्के ग्राहकांनी कंपनीच्या सेवेस उत्कृष्ट किंवा खूप चांगले म्हटले आहे. यानंतर, व्हिवो 83 टक्के वापरकर्त्यांसह आणि सॅमसंग हे 81 टक्के वापरकर्त्यांसह आहेत. वेगवान सेवेच्या बाबतीतदेखील ओप्पो अव्वल स्थानी आहे. दुसर्‍या स्थानावर रियलमी आहे. या प्रकरणात विव्हो तिसर्‍या क्रमांकावर आहे.

या सगळ्या अहवालात अनेक मोठ्या कंपन्या मागे पडलेल्या आहेत. एकदम आश्चर्यचकित करणार्‍या गोष्टी या अहवालात समोर आलेल्या आहेत.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here