30 वर्षात पहिल्यांदाच ‘त्या’बाबतीत नमला चीन; भारताकडून खरेदी करणार ‘ती’ गोष्ट; मिळाली 1 लाख टनाची ऑर्डर

दिल्ली :

गेल्या तीन दशकांत चीनने प्रथमच भारताकडून तांदूळ खरेदी सुरू केली आहे. इंडियन इंडस्ट्री ऑफिशियल्सच्या म्हणण्यानुसार, मोठ्या प्रमाणात पुरवठा आणि भारताकडून प्रचंड जबरदस्त ऑफरवर तांदूळ मिळाल्यामुळे चीनने ही खरेदी सुरू केली आहे. जगभरात तांदळाची सर्वाधिक निर्यात करणारा देश भारत आहे आणि चीन सर्वात मोठा आयातदार आहे.

चीन दरवर्षी तब्बल  40 लाख टन तांदूळाची आयात करतो. इतक्या मोठ्या प्रमाणात आयात करूनही चीनने गेल्या 30 वर्षात कधीच भारताकडून तांदूळ खरेदी केली नाही. भारताच्या तांदळाचा दर्जा चांगला नाही, हे कारण देऊन चीनने आजवर भारताचा तांदूळ नाकारला. मात्र 30 वर्षानी का होईना चीन या बाबतीत नमला.

चीनचा हा निर्णय अशा वेळी आला आहे जेव्हा भारत आणि चीन या दोन देशांमधील सीमा विवादांमुळे राजकीय ताणतणाव खूप जास्त आहे. एवढे तनाव असतानाही चीनने ही खरेदी केली आहे.

राईस एक्सपोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष बी.व्ही. कृष्णा राव यांनी संगितले की, चीनने प्रथमच भारताकडून तांदूळ खरेदी केला आहे. या आयात केलेल्या तांदळाच्या गुणवत्तेनुसार पुढील वर्षी त्यांची खरेदी वाढू शकते.

डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान भारतीय व्यापार्यांना चीनला १ लाख टन तांदूळ निर्यात करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. इंडस्ट्री ऑफिशियल्सच्या म्हणण्यानुसार हे तांदूळ प्रति टन 300 डॉलर (22,132.60 रुपये) दराने चीनला निर्यात केले जाईल. आतापर्यंत थायलंड, व्हिएतनाम, म्यानमार आणि पाकिस्तान येथून चीन तांदूळ खरेदी करत होता.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here