धक्कादायक : चीनी सैन्य घुसले 12 किलोमीटर आत; स्थापन केला ‘त्या’ ठिकाणी अड्डा

भारत-चीन सीमावाद काहीकेल्या कमी होण्याची शक्यता दिसत नाही. उलट कुरापती काढण्याच्या चीनी धोरणामुळे भारताने आणखी कडक पद्धतीने सीमेवर लष्कर वाढवून चीनला आव्हान दिले आहे. हे गरजेचे आहे. मात्र, त्याचवेळी चीनी सैन्याने लडाखमधील भाग सोडून थेट पूर्व पट्ट्यात एका ठिकाणी 12 किलोमीटरवर पुढे जाऊन आपला अड्डा स्थापन केला आहे.

होय, हे काही भारतीय सीमेवर झालेले नाही. मात्र, भारताचा शेजारी आणि सैन्याच्या दृष्टीने भारताच्याच जबाबदारीचा भाग असलेल्या भूतान या देशामध्ये चीनने ही कुरापत काढली आहे. नवभारत टाईम्स यांनी बातमीत म्हटले आहे की, भूतना देशाच्या आतमध्ये घुसून थेट 12 किलोमीटर आतमध्ये चीनने रस्ते तयार करून नागरिकांना राहण्यासाठी घरांचे बांधकाम केले आहे.

सिलीगुड़ी कॉरिडोर या भागात असे कृत्य करून चीनने भारताची डोकेदुखी वाढवली आहे. सॅटेलाईटद्वारे घेतलेल्या नव्या फोटोंच्या आधाराने ही धक्कादायक बाब उघडकीस आलेली आहे. एकूणच भारतीय सीमेवर अशांतता निर्माण करून जमीन बळकावण्याचे धोरण चीनने ठेवले आहे. त्याला भारत आता कसे प्रत्युत्तर देतो याकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे.

भूतान देशातील शेरसिंगमा या यातुंग घाटी या भागात चीनी नागरिकांना राहण्यासाठी वस्ती बनवली जात आहे. यासाठी अमो चू नदीवर एक पूल बांधला आहे. हा एक महत्वाचा पूल असून त्याद्वारे आपल्या सैन्य आणि नागरिक यांना या भागात तैनात करण्याची चीनची योजना आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here