LPG स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे नवे दर आले समोर; जाणून घ्या काय आहेत ते

मुंबई :

सध्या महागाई वाढते आहे. कोरोनामुळे बसलेल्या आर्थिक संकटाच्या झटक्यातुन अजून लोक सावरलेले नाहीत. आता अशातच LPG स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे नवे दर समोर आले आहे. आपल्या घरात इतर कुठलीही गोष्ट नसली तरी चालते सिलेंडर मात्र हवा असतो. म्हणूनच आता आपल्या खिशाला अजून कात्री लागणार की काय, अशी चिंता तुम्हाला वाटत असेल. मात्र सरकारी तेल कंपन्यांनी स्वयंपाकाच्या गॅसच्या बाबतीत डिसेंबरमध्ये सुद्धा दिलासा दिला आहे.

1 डिसेंबर 2020 ला सुद्धा घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. यापूर्वी 14 किलोग्रॅमच्या घरगुती गॅस सिलेंडच्या दरात जुलै 2020 ला 4 रुपयांची वाढ करण्यात आली होती. तर, यापूर्वी जूनच्या दरम्यान दिल्लीत 14.2 किलोग्रॅमचा विना अनुदानित एलपीजी सिलेंडर 11.50 रुपयांनी महागला होता, तर मे महिन्यात 162.50 रुपयांनी स्वस्त झाला होता.

डिसेंबर महिन्यासाठी 19 किलोग्रॅमच्या कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. 55 रुपयांच्या आसपास दरात वाढ झाली आहे.  देशातील सर्वात मोठी ऑईल मार्केटिंग कंपनी आयओसीच्या वेबससाइटवर देण्यात आलेल्या दरानुसार दिल्लीत सिलेंडरच्या किमती स्थित आहेत. दिल्लीत सध्या 14.2 किलोचा सबसिडीवाला गॅस सिलेंडर 594 रुपयांना मिळत आहे. तर मुंबईत सुद्धा सबसिडीवाल्या सिलेंडरची किंमत 594 रुपये आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here