अबबब… Apple ला बसला ‘एवढा’ आर्थिक भुर्दंड; वॉटरप्रूफ असल्याच्या दाव्यावरुन केला जातोय ‘हा’ आरोप

दिल्ली :

इटलीच्या एंटी-ट्रस्ट अथॉरिटी एजीसीएमने Apple ला 10 दशलक्ष युरो (सुमारे 12 दशलक्ष डॉलर्स) दंड केला आहे. कंपनीच्या आयफोनच्या पाण्याच्या प्रतिकार क्षमतेबाबत दिशाभूल करणारे किंवा चुकीचे दावे केल्याबद्दल हा दंड आकारण्यात आला आहे. म्हणजेच आयफोनने वॉटरप्रूफ असल्याच्या केलेला दावा खोटा असल्याचे संगितले आहे.   

इटलीच्या प्रतिसपर्धा प्राधिकरणाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की प्रीमियम स्मार्टफोन बनवणार्‍या कंपनीने त्यांच्या आयफोनला वॉटर रेसिस्टन्स किंवा वॉटरप्रूफ असल्याची जाहिरात केली, मात्र हे कोणत्या परिस्थितीत लागू होते, याविषयी संगितले नाही.

Appleच्या वॉटरप्रूफ असल्याच्या दाव्यावर टीका करीत AGCM ने म्हटले आहे की हे दावे काही विशिष्ट परिस्थितीतच खरे आहेत. Appleने असा दावा केला आहे की त्याचे वेगवेगळे आयफोन मॉडेल्स चार मीटरपर्यंत खोल पाण्यात 30 मिनिटे वॉटरप्रूफ आहेत.

शुद्ध व स्थिर पाण्यात हा फोन टिकू शकतो इतर पाण्यात जर फोन पडला तर खराब होऊ शकतो, असेही म्हटले जात आहे. नेमकं खरे काय आणि खोटे काय हा प्रश्न असला तरी Apple मोठा आर्थिकदंड भरावा लागणार आहे.

संपादन : स्वप्नील पवार   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here