दोन वर्षात पहिल्यांदाच पेट्रोलच्या दरात झाली ‘एवढी’ वाढ, डिझेलही महागले; वाचा नवे दर

मुंबई :

देशात पेट्रोलची किंमत 25 महिन्यात प्रथमच एका उंचीवर पोहोचली आहे. 19 नोव्हेंबरपासून पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 1.28 रुपयांनी वाढ झाली आहे. या काळात डिझेलच्या दरात प्रतिलिटर 1.96 रुपयांनी वाढ झाली आहे. सोमवारी दिल्लीत पेट्रोलची किंमत 82.34 रुपये होती. 19 ऑक्टोबर 2018 नंतरची ही सर्वाधिक आहे. सोमवारी डिझेलची किंमत प्रतिलिटर 72.42 रुपये होती. यावर्षी 16 सप्टेंबरनंतरची ही सर्वाधिक  किंमत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे देशात इंधनाचे दरही वाढले आहेत. नोव्हेंबरमध्ये कच्च्या तेलाच्या दोन्ही मोठ्या करारांमध्ये 27 टक्क्यांची वाढ झाली आहे. कोरोना लस लवकरच आल्याची बातमी कच्च्या तेलाच्या किंमतीं वाढवणारी ठरली. असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, कोरोना लस लागू झाल्यानंतर जगभरातील अर्थव्यवस्थेत वेगवान पुनर्प्राप्ती होईल. यामुळे कच्च्या तेलाचा वापर वाढण्याची अपेक्षा आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किंमतींमध्ये जोरदार वाढ झाली आहे. नोव्हेंबर महिना रेकॉर्ड ब्रेकिंग ठरला आहे. या कालावधीत क्रूडची किंमत गेल्या 20 वर्षात तिसर्‍या क्रमांकाची झाली आहे. नोव्हेंबरमध्ये ब्रेंट क्रूड 23 टक्क्यांनी महागला आहे, तर WTI क्रूडमध्ये 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

नोव्हेंबरमध्ये ब्रेंट क्रूड 23 टक्क्यांनी महागला आहे. या काळात क्रूडचे दर प्रति बॅरल 38 डॉलर वरुन 47.59 डॉलरवर बंद झाले. नोव्हेंबरमध्ये क्रूडनेही 48 डॉलर ओलांडले आहेत. तथापि, यावर्षी आतापर्यंत जानेवारीच्या किंमतीपेक्षा क्रूड 22.47 टक्के कमकुवत आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here