महिला कर्मचाऱ्यांसाठी सरकारने केली ‘ही’ मोठी घोषणा; पगारापासून दर्जापर्यंत बदलणार ‘हे’ नियम

दिल्ली :

कोरोना येण्यापूर्वी आणि आता कोरोना असताना कामाच्या लाखो लोकांच्या कामाच्या पद्धतीत प्रचंड बदल झालेले आहेत. विशेष बाब म्हणजे बहुतांश क्षेत्रातील कामाचे नियमही बदलले आहेत. आता अशातच अजून एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. कामगार मंत्रालयाने संसदेत नवीन कामगार संहिता प्रस्तावित केली आहे, जी पास झाल्यानंतर अधिक गोष्टी व्यवस्थित होतील. नवीन कामगार संहिताचा सर्वाधिक फायदा महिला कामगारांना होणार आहे.

आपल्याकडे असे म्हटले जाते की महिला आणि पुरुष समान आहेत, परंतु ते दिसत नाही. यावेळी मात्र कामगार मंत्रालयाने मोठे पाऊल उचलत स्री-पुरुष समानता दाखवून दिली आहे. कामगार मंत्रालयानेही महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये पगारापासून कामावर बदल करण्याची योजना आखण्यात आली आहे. आधार लिंक असलेल्या खात्यांमधील डिजिटल पेमेंटमुळे महिलांसाठी समान वेतन आणि किमान वेतन निश्चित झाले आहे. याचा फायदा कामगार महिलांना मोठ्या प्रमाणात होईल.

या संहितेत असलेल्या महितीनुसार, त्यांना खाणकामसह इतर अनेक क्षेत्रात काम करण्याचे स्वातंत्र्य मिळू शकते. एवढेच नव्हे तर पगाराच्या बाबतीतही त्यांना पुरुषांइतकाच दर्जा देण्यात यावा. सर्वांना समान वेतनाची तरतूद, आता डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून महिला कमी पगार मिळण्याच्या चिंतेतून मुक्तता होतील. याशिवाय आतापर्यंत देशातील असंघटित क्षेत्रातील पुरुषांपेक्षा महिला कामगारांना कमी पगार दिला जात होता, परंतु पगारातील भेदभावही नव्या कामगार संहितामुळे संपविले जाईल.

महिला कामगारांनाही खाणकाम, बांधकाम इत्यादी सर्व क्षेत्रात काम करण्याची मुभा दिली जाईल. आतापर्यंत महिला कामगारांना खाणकाम आणि बांधकाम यासारख्या क्षेत्रात काम करण्याची परवानगी नव्हती. त्यात केवळ पुरुष कामगार काम करू शकत होते.

संपादन : स्वप्नील पवार   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here