नवरा बायकोच्या नात्यावरील हे अतरंगी जोक्स नक्कीच वाचा; पोटभर हसा

1) बायको – अहो, उठा चला लवकर… मला चहा करायचाय

नवरा – मग मी कशाला उठू.. मी काय चहाच्या पातेल्यात झोपलोय

बायकोने चाहच्या पातेल्याने डोक फुटूस्तवर हानला….

2) पत्नी – कुठे जात आहातय़

पती – मरायला चाललोय… सुसाइड करीन

पत्नी – कुठेही जा, पण स्वेटर घालून जा…. बाहेर खूप थंडी आहे, आजारी पडल्यावर तुमची खैर नाही…

3) बायको (चिडून) : मी चालले घर सोडून. रहा तुम्ही एकटेच तुमच्या घरात…

नवरा : मी चाललो देवळात…

बायको (आणखी रागात) : मी अजिबात परत येणार नाहीये तुम्ही कितीही नवस केलेत तरी..

नवरा (शांतपणे) : अग वेडे, मी आता नवस फेडायला चाललोय..

बायकोने अजून तरी घराचा दरवाजा उघडलेला नाही

4) बायकोशी भांडलेला एक बिचारा नवरा आत्मनिर्भर बनण्यासाठी स्वयंपाक घरात घुसला…

घरी असलेले चार ब्रेड स्लाईस भाजले व त्यावर हिरवी चटणी लावून खाल्ला

एक तास झाला, बिचारा एका कोपऱ्यात गप्प बसून आहे. आणि त्याची बायको त्याला वारंवार विचारत आहे…

मेहंदी भिजवून किचन मध्ये ठेवले होती कुठे गेली.

5) नवरा बायकोचं जोरदार भांडण होतं…

बायको – मी १ ते १० पर्यंत मोजेन.. जर तुम्ही बोलला नाहीत तर मी विष पिऊन टाकेन.

(बायको १ ते ५ पर्यंत मोजते, पण नवरा काहीच बोलत नाही.

बायको अचानक आकडे मोजणं थांबवते.

नवरा : ही काय फालतुगिरी.. ५ च्या पुढे मोज की…

बायको : हुश्श.. बरं झालं तुम्ही बोललात.. नाही तर विषच प्यावं लागलं असतं…

6) नवरा: कुठे गेली होतीस?
बायको: रक्तदान करायला..
नवरा: हे बरोबर नाही.. माझं प्यायचं
आणि बाहेर जाऊन विकायचं..

7) बायको: माझी मैत्रीण येणार आहे,
दोन दिवस तुम्ही बाहेर झोपा..
नवरा: बरं.. पण वचन दे,
माझी मैत्रीण आली की तू पण दोन दिवस बाहेर झोपशील…!

8) बायको: काय हो.. इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय?
नवरा: बहिणीशी!
बायको: अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं?
नवरा: अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय…!

9) नवरा बायकोचे भांडण चालू होते,
नवरा: तू कुत्री..
बायको: तू कुत्रा..
तेवढ्यात त्यांचा मुलगा म्हणतो,
” हे हे हे,
मी पिल्लू ”

10) बायको: अहो एक सांगू का,
पण मारणार तर नाही ना?
नवरा: हो सांग ना,
बायको: मी गरोदर आहे,
नवरा: अगं ही तर आनंदाची बातमी आहे,
मग तू एवढी घाबरतेस का?
बायको: कॉलेजला असतांना ही बातमी बाबांना सांगितली होती,
तेव्हा त्यांनी मारलं होतं…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here