दिल्ली :
ज्वालामुखी म्हटलं की सगळीकडे जाळ, आग आणि धुराचे साम्राज्य असे चित्र आपल्या डोळ्यासमोर येते. इंडोनिशामध्ये एके ठिकाणी एका ठिकाणी भयंकर अशा ज्वालामुखीचा उद्रेक झाला. ज्यामुळे हजारो लोक स्थलांतरित झाले. धक्कादायक म्हणजे हा उद्रेक इतका मोठा होता की, त्या भागातून चार किलोमीटरच्या परिसरात याचा प्रभाव बघायला मिळाला. तसेच त्या भागातील आकाशात सगळीकडे राख आणि धुराचे लोळ पसरले असल्याचे चित्र समोर आले आहे. हे ठिकाण राजधानी जकार्तापासून जवळपास २,६०० किलोमीटर दूर आहे.
रवीवारी इंडोनिशाच्या पूर्व नुसा तेंगारा प्रांतात हा ज्वालामुखीचा भयानक असा उद्रेक झाला. . सध्या येथील अनेक लोक स्थलांतरित होत आहेत. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या महितीनुसार, धमाका झाल्यावर आजूबाजूचे राहणारे लोक घाबरलेले आहेत आणि ते अजूनही शरण घेण्यासाठी ठिकाणा शोधत आहेत. इले लेवोटोलोकमध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर येथील आजूबाजूच्या लोकांमध्ये दहशत पसरली आहे.
इंडोनेशियातील प्रशासनाने दिलेल्या महितीनुसार, इथे जवळपास १३० सक्रिय ज्वालामुखी आहेत. अशाप्रकारच्या ज्वालामुखीचा प्रभाव काही महिने किंवा काही आठवड्यांपर्यंत राहतो. दरम्यान या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या ज्वालामुखीच्या प्रभाव इतका जास्त होता की, २,७०० पेक्षा अधिक लोकांना दुसऱ्या ठिकाणावर स्थलांतर करावे लागले.
संपादन : स्वप्नील पवार
- ‘या’ ई-कॉमर्स वेबसाइटची भन्नाट ऑफर; ‘या’ 12 स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी
- नवीन वर्षात महिंद्राचा धमाका; गाड्यांवर मिळत आहे तब्बल 2.2 लाखांचा डिस्काउंट
- हिवाळ्यात दुधात खारीक टाकून प्या; मिळवा ‘हे’ आरोग्यदायी फायदे
- मैत्री वरील हे भन्नाट जोक्स वाचून आवरणार नाही हसू; हसा चकटफू
- जगातील सर्वात महागडी बॅट आहे ‘या’ भारतीय खेळाडूकडे; किंमत वाचून व्हाल अवाक