नववर्षाच्या सुरुवातीला सोन्याचे दर होऊ शकतात ‘एवढे’ कमी; वाचा काय आहे कारण

मुंबई :

कोरोना लसीबाबत येणाऱ्या सकारात्मक वृत्तांमुळे लोकांचे लक्ष सुरक्षित गुंतवणुकीवरून हटले आहे. विशेष म्हणजे लोकांनी आता सोन्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे सोन्याची मागणी कमी झाली परिणामी किंमतही कमी झाली आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या काळात सोन्याच्या आयातीमध्ये मोठी घट झाली आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत बाजारात सोन्याचांदीचे भावही घसरले आहेत. ऑगस्टपासून सोने ८००० रुपयांनी घसरले आहे. 

अशातच गुंतवणूकदारांसाठी अजून एक मोठी बातमी समोर आली आहे. नववर्षाच्या सुरुवातीला सोन्याचे दर कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. २०२१ च्या सुरुवातीला सोने 42,000 प्रति ग्रॅम होण्याची शक्यता आहे. पुढील अवघ्या दोन महिन्यांत सोन्याच्या किंमतीत मोठी घट होण्याची शक्यता आहे.

ऑगस्टमध्ये सोने ५६३७९ रुपयांवर गेले होते. तेव्हा ते आणखी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, रशियाची स्तुतनिक व्ही कोरोना लस येताच सोन्याने कच खाल्ली. या आठवड्यात सोन्याचा ४ डिसेंबरचा वायदा भाव ४८१०६ प्रति १० ग्रॅमवर आला. शेवटच्या दिवशी सोन्यामध्ये ४११ रुपयांची घट नोंदविली गेली. 

कोरोना लसीसंबंधित चांगल्या बातमीनंतर सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये सातत्याने घट झाली आहे. सोन्याच्या किंमती घसरण्याचा ट्रेंड अजून दिसू शकेल. नवीन वर्षानंतर ही लस बाजारात आणली गेली तर एमसीएक्सवरील सोन्याची किंमत 45000 रुपयांवर येऊ शकते, अशी माहिती एस्कॉर्ट सिक्युरिटीचे संशोधन प्रमुख आसिफ इक्बाल यांनी दिली.

जसजशी कोरोना लस बनविण्याच्या आशा आणि तयारी सुरु झाली आहे, तसतशी ती लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या शक्यताही वाढू लागल्या आहेत. यामुळे सोन्याच्या दरात त्या प्रमाणात घट दिसणार आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार फेब्रुवारी २०११ पर्यंत सोन्याचे दर हे ४२००० रुपये प्रति १० ग्रॅमवर जाण्याची शक्यता आहे. याचबरोबर चांदीच्या दरातही घट दिसण्याची शक्यता आहे.

दरम्यान चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या काळात सोन्याच्या आयातीमध्ये मोठी घट झाली आहे. यावेळी 9.28 अब्ज डॉलर्स किंमतीची सोन्याची आयात करण्यात आली. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीपेक्षा हे 47.42 टक्के कमी आहे. 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here