बापरे… म्हणून पुढच्या वर्षी कमी होऊ शकतात वोडाफोन आयडियाचे 7 कोटी ग्राहक; मागच्या 2 वर्षात गमावलेत 15.5 कोटी, ‘अशी’ होईल अवस्था

मुंबई :

व्होडोफोन आयडिया (vi) पुढील 12 महिन्यांत 5 ते 7 कोटी ग्राहक गमावू शकतात. गेल्या नऊ तिमाहीत कंपनीने सुमारे 15.5 कोटी  ग्राहक गमावले आहेत. फिच रेटिंग्जने त्यांच्या अहवालात हे सांगितले आहे. ते म्हणाले की, व्होडाफोन आयडिया सोडणारे जवळपास निम्मे ग्राहक रिलायन्स जिओचे ग्राहक बनू शकतात, तर निम्मे ग्राहक भारती एअरटेलला जाऊ शकतात.

फिच रेटिंग्जने म्हटले आहे की, येत्या 12 ते 18 महिन्यांत भारती आणि जिओच्या एकत्रित बाजाराचा हिस्सा 80 टक्क्यांपर्यंत पोहोचेल अशी अंदाज आहे. सप्टेंबरमध्ये हे प्रमाण 74 टक्के होते. एअरटेलने दुसर्‍या तिमाहीत 1.4 कोटी नवीन ग्राहक तयार केले आहेत. जिओच्या 70 लाख नवीन ग्राहकांपेक्षा ही दुप्पट आहे.

व्होडाफोन आयडियाचा बाजारातील हिस्सा वेगाने कमी होत आहे. कंपनीची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आहे. त्याचा परिणाम त्यांच्या व्यवसायावर होत आहे. फिचने म्हटले आहे की व्होडाफोनची शेअर्स विक्रीतून आणि कर्ज घेऊन सुमारे 4.4 अब्ज डॉलर्स जमा करण्याची योजना आहे. परंतु, टेलिकॉम मार्केटमध्ये त्याचे स्थान सुधारण्याची शक्यता नाही. ज्या ग्राहकांनी कंपनील  सोडले आहे त्यांना पुन्हा गुंतवून ठेवणे देखील कंपनीला अवघड आहे. कारण की भांडवलाच्या विस्तारासाठी जमा केलेली रक्कम पुरेशी नाही.

व्होडाफोन आयडियाला एडजस्टेड ग्रॉस रेवेन्यू रूपात दूरसंचार विभागाला एकूण 8.9 अब्ज डॉलर्स द्यावे लागणार होते. आतापर्यंत सुमारे 1.1 अब्ज डॉलर्स भरले आहेत. कंपनीला आधीच अडचणींचा सामना करावा लागला होता. एजीआरच्या ओझ्यामुळे व्होडाफोनच्या समस्येमध्ये अजूनच भर पडली आहे. मंगळवारी व्होडाफोन आयडियाची शेअर किंमत 3.06 टक्क्यांनी वाढून 10.10 रुपयांवर बंद झाली.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here