दिल्ली :
ग्बोबल NCAP (New Car Assessment Programme) द्वारे टेस्ट केल्यानंतर मारुती सुझुकीच्या एस-प्रेसो या कारला शून्य रेटिंग देण्यात आलं आहे. तसेच मारुती सुझुकी एस-प्रेसो ही कार सुरक्षित नसल्याचं प्रमाणपत्रही देण्यात आलं. त्यानंतर वाहन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. अगदी सामान्य माणसेही आपल्या गाडीला क्रॅश टेस्टमध्ये किती रेटिंग आहे ते चेक करू लागली. आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात सुरक्षित हॅचबॅक कारविषयी सांगणार आहोत.
2014 ते 2020 या जागतिक ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्ट दरम्यान प्रौढांच्या सुरक्षिततेत सर्वाधिक स्टार रेटिंग मिळवल्यानंतर अव्वल क्रमांकावर असलेल्या भारतीय कार महिंद्रा एक्सयूव्ही 300, टाटा अल्ट्रोज आणि टाटा नेक्सन या आहेत. यापैकी, 2020 मध्ये टाटा अल्ट्रोज आणि महिंद्रा एक्सयूव्ही 300 ची क्रॅश टेस्ट घेण्यात आली. क्रॅश टेस्टमध्ये टाटा अल्ट्रोजने प्रौढांच्या सुरक्षिततेमध्ये 5 स्टार रेटिंग प्राप्त केले आहे. यासह ही देशातील सर्वात सुरक्षित हॅचबॅक कार आहे.
Tata Altroz या गाडीलाही ग्लोबल एनसीएपी टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंगही मिळाली आहे. यात ड्युअल एअरबॅग, कॉर्नरिंग ब्रेक कंट्रोल, ईबीडी असलेले एबीएस, रिअर पार्किंग सेन्सर्स, स्पीड वॉर्निंग अलर्ट सारखे फीचर्स देण्यात आहेत आहेत.
Tata Nexon या गाडीला डुअल फ्रंट एयरबैग्स, एबीएस, ईबीडी, ईएसपी, ट्रैक्शन कंट्रोल, हिल-होल्ड असिस्ट असे अनेक फीचर्स दिलेले आहेत. तटाच्या या दुसऱ्या कारला ‘सुरक्षित कार’ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.
संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी
- अशी बनवा तेलंगण अंडा बिर्याणी; रेसिपी वाचा आणि नक्की ट्राय करा
- ‘या’ ई-कॉमर्स वेबसाइटची भन्नाट ऑफर; ‘या’ 12 स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी
- नवीन वर्षात महिंद्राचा धमाका; गाड्यांवर मिळत आहे तब्बल 2.2 लाखांचा डिस्काउंट
- हिवाळ्यात दुधात खारीक टाकून प्या; मिळवा ‘हे’ आरोग्यदायी फायदे
- मैत्री वरील हे भन्नाट जोक्स वाचून आवरणार नाही हसू; हसा चकटफू